Rohit Shetty Firing: मुख्य शूटरसह चार जणांना हरियाणातून अटक, आतापर्यंत ११ जणांना घेतले ताब्यात

Rohit Shetty Firing: मुख्य शूटर सह चार जणांना हरियाणातून अटक, आतापर्यंत ११ जणांना घेतले ताब्यात
Rohit Shetty
Rohit Shetty Firing case main sharp shooter arrested instagram
Published on
Updated on
Summary

दिग्दर्शक रोहित शेट्टी यांच्याशी संबंधित फायरिंग प्रकरणात पोलिसांनी मोठी कारवाई करत मुख्य शूटरसह चार जणांना हरियाणातून अटक केली आहे. या प्रकरणात आतापर्यंत ११ जणांना ताब्यात घेण्यात आले असून तपास यंत्रणा अधिक तपास करत आहे.

Rohit Shetty Firing Case Update

मुंबई क्राईम ब्रँचने दिग्दर्शक रोहित शेट्टीच्य़ा घरावर झालेल्या (१ फेब्रुवारी २०२६) गोळीबार प्रकरणी मुख्य शूटरसह चार जणांना अटक केली आहे. यामध्ये मुख्य शूटर दीपक शर्मा सह चार जणांना आज १६ फेब्रुवारी रोजी हरियाणातील बहादुरगढ येथून अटक केली आहे. याप्रकरणी पोलिसांना आतापर्यंत ११ जणांना अटक केलीय. चौकशीतून समोर आले आहे की, हा कट लॉरेंस बिश्नोई गँगचा आहे, जो परदेशातून ऑपरेट होत आहे. गँगमधील गुन्हेगार हरि बॉक्सर आणि आरजू बिश्नोईने दीपकला टास्क दिला होता.

Rohit Shetty
Apurva Nemlekar | 'आयुष्याची दुसरी सुरुवात..' रात्रीस खेळ चाले फेम अपुर्वा नेमळेकरने बांधली लग्नगाठ, पती आहे तरी कोण?

दीपकने रोहित शेट्टीच्या घरावर गोळीबार केला होता. त्याचे साथीदार सन्नी आणि सोनूने रोहित शेट्टीच्या घराबाहेर रेकी केली होती. दुसरा साथीदार ऋतिकने दीपक आणि अन्य साथीदारांना लपवण्यास मदत केली होती. आतापर्यंत या प्रकरणी ११ जणांना अटक केली आहे. आधी सात जणांना पुणे आणि उत्तर प्रदेशमधून अटक केली होती. १५ जानेवारीला हरियाणा आणि राजस्थानच्या सीमेवरून अटक करण्यात आली.

सोशल मीडियाच्या माध्यमातून दीपक हा आरजू बिश्नोईच्या संपर्कात आला होता. आरजू हा परदेशात आहे. आरजूने शुभम लोनकर, जो बाबा सिद्दीकी केसमध्ये वाँटेड आहे, त्याच्याशी बातचीत केली. मग रोहित शेट्टीच्या घरावर फायरिंग प्लॅन बनवला.

Rohit Shetty
Hardik Pandya | चाहत्यांच्या नजरेतून सुटलं नाही हे ‘M’! 'प्रेमच हे..' हार्दिक पांड्याचा टॅटू ते माहिकासाठी खास गिफ्टदेखील चर्चेत

दीपकला गोळीबाराचे ५० हजार रुपये मिळाले होते. परदेशी शस्त्र देखील दीपकला मिळाले होते. गोळीबार देखील परदेशी बंदुकीतून जाली. त्याला सांगण्यात आलं होतं की, पुढे देखील त्याला मोठी रक्कम मिळत जाईल. गोळाबारानंतर हे शूटर्स वेगवेगळ्या ठिकाणी लपून बसले होते. दिल्ली-एनसीआरमध्ये काही ठिकाणी तर काही हॉटेल्समध्ये देखील थांबले. ४-५ दिवसांनंतर बहादुरगढमध्ये एका शेतामध्ये ते लपले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news