

भारतीय क्रिकेटपटू Hardik Pandya यांच्या हातावरील ‘M’ टॅटूने सोशल मीडियावर चर्चेला उधाण आले आहे. या टॅटूमागे अभिनेत्री माहिका शर्मा यांचे नाव असल्याची चर्चा रंगली असून तिला दिलेल्या महागड्या गिफ्टमुळेही चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढली आहे.
भारतीय क्रिकेट टीमचा स्टार ऑलराऊंडर Hardik Pandya पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. यावेळी कारण ठरलं आहे त्याच्या मानेवरील ‘M’ अक्षराचं टॅटू. सोशल मीडियावर काही फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर चाहत्यांमध्ये या टॅटूमागील अर्थाबाबत चर्चा सुरू झाली आहे. व्हॅलेंटाईन डेला हार्दिक आणि माहिका चर्चेत आली. त्याने आपली गर्लफ्रेंड माहिका शर्मासाठी असं काही तरी खास केलं की, त्याची सगळीकडे चर्चा होत आहे.
हार्दिक पांड्याने व्हॅलेंटाईन डेला गर्लफ्रेंड माहिका शर्माला खूप किमती गिफ्ट दिलं. प्रेम व्यक्त करण्यासाठी त्याने नवे टॅटू बनवले, जे खूपच खास आहे. हार्दिकला केवळ ‘M’ लिहायचं होतं. परंतु, आर्टिस्ट सोबत झालेल्या बातचीतमध्ये रात्री उशीरापर्यंत एक आयडिया मोठ्या डिझाईनमध्ये बदलली.
हार्दिक पांड्याच्या M टॅटूचे रहस्य काय?
एलियन्स टॅटूमध्ये बनलेल्या या टॅटूमध्ये दोन बिबट्या आहेत. एक बोल्ड आआणि रिअल सारखे. दुसरे रेखीव लाईन्समध्ये बनलेले आहे. हे डिझाईन म्हणजे कपलमध्ये असणारी सुंदर पार्टनरशीप दर्शवते. सोशल मीडियावर हार्दिकचा हा टॅटू खूप व्हायरल होत आहे, या फोटोमध्ये त्याची गर्लफ्रेंड माहिका देखील दिसत आहे.
हार्दिक पांड्याचे खास गिफ्ट
हार्दिक आणि माहिका यांचे नाते २०२५ पासून बहरत गेले. रिपोर्टनुसार, हार्दिक माहिकाला एक सिंपल गिफ्ट द्यायचं होतं. मानेवर केवळ M अक्षराचा टॅटू काढायचा होता. पण टॅटू स्टुडिओमध्ये डिटेल्ड आर्टवर्क करण्यात आले. या टॅटू स्टुडिओच्या फाउंडरने पोस्टमध्ये लिहिले की, 'तुमचा अंदाज खरा आहे, तो हार्दिक पांड्या होता. तो रात्री २ वाजता माहिकासाठी एक गिफ्ट घेऊन आला. कोणतीही पोस्ट नाही. कोणतेही वचन नाही, जो यासमोर फिके पडेल. बस एक शांत आयडिया. मानेवर एक “M”, पण डिझाईन केवळ एक अक्षरावर थांबले नाही. दोन बिबट्या बनवले, जे एकत्र धावत आहेत. ...