Apurva Nemlekar | 'आयुष्याची दुसरी सुरुवात..' रात्रीस खेळ चाले फेम अपुर्वा नेमळेकरने बांधली लग्नगाठ, पती आहे तरी कोण?

Apurva Nemlekar | व्हॅलेंटाईन डे ला प्रेमावर शिक्कामोर्तब! अपूर्वा नेमळेकर झाली मिसेस गोवळकर
Apurva Nemlekar
Apurva Nemlekar got married instagram
Published on
Updated on
Summary

‘रात्रीस खेळ चाले’मधील शेवंता म्हणून प्रसिद्ध असलेल्या अपूर्वा नेमळेकरने व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी तनुज गोवलकर यांच्याशी विवाह केला. सोशल मीडियावर भावनिक पोस्ट करत तिने “आयुष्याची दुसरी सुरुवात” असल्याचे सांगितले. तिच्या या नव्या प्रवासामुळे चाहत्यांमध्ये आनंद आणि उत्सुकता दोन्ही निर्माण झाले आहेत.

Apurva Nemlekar got married

रात्रीस खेळ चाले फेम अभिनेत्री अपुर्वा नेमळेकर हिने १४ फेब्रुवारी व्हॅलेंटाईन दिवशी लग्नगाठ बांधली. तिने इन्स्टाग्राम अकाऊंटवर तिच्या लग्नाचे फोटो शेअर ही आनंदाची वार्ता दिलीय. शिवाय इन्स्टाग्रामवर मोठी पोस्ट देखील लिहिलीय.

Apurva Nemlekar
Battle of Galwan New Song | सलमान-चित्रांगदाच्या नव्या गाण्यात रोमँटिक ट्विस्ट, एका तासात 138,231 व्ह्यूज (व्हिडिओ)

अपुर्वाने काय लिहिलं इन्स्टा पोस्टमध्ये?

''१४ फेब्रुवारी २०२६ - एक अशी तारीख जी कायमची आमची झाली. प्रेम, विश्वास आणि कुटुंबियांच्या आशीर्वादांच्या साक्षीने आपल्या आयुष्याचा नवा अध्याय सुरू केल्याची आनंदवार्ता व्यक्त केली आहे. अनेक चढ-उतार, परीक्षा आणि संघर्ष अनुभवूनही प्रेमावरील विश्वास कधीच सोडला नाही. अखेर देवाच्या कृपेने तिला आयुष्यात शांती आणि सहवास लाभला, आणि व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी प्रेमाला नवे घर मिळाले. आता मी “श्रीमती अपूर्वा तनुज गोवळकर” म्हणून आपली ओळख अभिमानाने जाहीर करते....''

तिने पोस्टमध्ये पुढे म्हटलंय- 'ही आमच्या आयुष्याची दुसरी सुरुवात आहे. समजूतदारपणे आणि अतिशय आदरपूर्वक आम्ही हा निर्णय घेतला आहे. आता या प्रवासात तुम्हा सर्वांचं प्रेम, आशीर्वाद कायम सोबत राहूद्यात. माझ्या आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यात खंबीरपणे साथ दिल्याबद्दल धन्यवाद. आज मी प्रचंड आनंदी अन् कृतज्ञ आहे. With Love, मिसेस अपूर्वा तनुज गोवळकर...'

Apurva Nemlekar
Valentine's day | No Proposal, No Drama! गुपचूप वाढलं प्रेम, थेट हिमाचलमध्ये लग्न, Aditya Dhar-Yami Gautam ची खास प्रेमकहाणी

या लग्नसोहळ्यात तिने पारंपरिक गडद हिरव्या रंगाची नऊवारी साडी, हातात हिरवा चुडा, मंगळसूत्र असा लूक केला होता. ‘आभास हा’, ‘रात्रीस खेळ चाले’, ‘प्रेमाची गोष्ट’, ‘शुभविवाह’ अशा मालिकांमध्ये अपुर्वाने काम केलं आहे.

अपुर्वीविषयी थोडेसे-

अपुर्वा नेमळेकर या मराठी टेलिव्हिजन आणि चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहेत. ‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेत तिने साकारलेली ‘शेवंता’ ही भूमिका प्रचंड गाजली आणि त्यांना घराघरात ओळख मिळाली. तिने विविध मराठी मालिकांमध्ये आणि रिॲलिटी शोमध्ये सहभाग घेतला आहे. ‘बिग बॉस मराठी’ या कार्यक्रमातील त्यांच्या सहभागामुळेही ती चर्चेत राहिली होती. 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news