रोहिणी हट्टंगडी यांना गिरीशिखरे पुरस्कार

Rohini Hattangadi
Rohini Hattangadi

पुढारी ऑनलाईन डेस्क

महाराष्ट्रातील सर्जनशील व्यक्तींना सन्मानित करण्यासाठी मुंबईत महाराष्ट्राची गिरीशिखरे पुरस्कार सोहळा संपन्न होणार आहे. हा सोहळा २६ डिसेंबर २०२१ रोजी दुपारी ३ ते रात्री १० या वेळेत रंगशारदा नाट्यमंदिर, लीलावती हॉस्पिटलजवळ, वांद्रे (प.) येथे रंगणार आहे. या कार्यक्रमात शास्त्रीय व लोककलाकारांचा रंगारंग सांस्कृतिक कार्यक्रम सादर होणार आहे. या कार्यक्रमात अमोल पालेखर, सुनील गावस्कर, रोहिणी हट्टंगडी, भीमराव पांचाळे, सुरेश वाडकर, उषा मंगेशकर, अनिता डोंगरे, आशा खाडिलकर आणि तेजस्वनी सावंत यांना महाराष्ट्राचे राज्यपाल श्री भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते सन्मानित करण्यात येणार आहे.

Rohini Hattangadi
Rohini Hattangadi

महाराष्ट्राचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, यांची देखील कार्यक्रमाला उपस्थित असणार आहे. या शुभप्रसंगी विविध क्षेत्रातील पन्नास नामवंतांना 'महाराष्ट्राची गिरिशिखर' हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. या पन्नास व्यक्तिमत्त्वांपैकी वीसहून अधिक व्यक्तींना भारत सरकारने नागरी पुरस्काराने सन्मानित केले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news