Riteish Deshmukh handling kids|जेव्हा मुले घरात त्रास देतात, तेव्हा काय करतो रितेश देशमुख? वापरतो 'ही' भन्नाट ट्रिक

Riteish Deshmukh parenting tips | जेव्हा मुले घरात त्रास देतात, तेव्हा काय करतो रितेश देशमुख, वापरतो ही भन्नाट ट्रिक
Riteish Deshmukh handling- kids
Riteish Deshmukh handling kidsinstagram
Published on
Updated on
Summary

बॉलिवूडमधील सर्वात 'क्यूट कपल' म्हणून ओळखले जाणारे रितेश आणि जेनेलियाबातचा एक किस्सा आहे. या कपलला दोन मुले आहेत. अक्षय कुमारच्या एका शोमध्ये रितेशने सांगितले होते की, मुले घरामध्ये त्रास देत असतील तर तो काय करतो?

Riteish Deshmukh how to handling kids at home

बॉलीवूड अभिनेता रितेश देशमुख (Riteish Deshmukh) त्याच्या अभिनयासोबतच सोशल मीडियावरील त्याच्या व्हिडिओंसाठी ओळखला जातो. रितेश आणि त्याची पत्नी जेनेलिया अनेकदा त्यांच्या मुलांसोबतचे (रियान आणि राहिल) व्हिडिओ शेअर करून चाहत्यांचे मनोरंजन करतात. आता रितेशचे पॅरेंटिंग ट्रिक्स व्हायरल झाले आहेत. अक्षय कुमारच्या एका शोमध्ये रितेशने सांगितले होते की, तो कशा प्रकारे आपल्या मुलांना बँडल करतो. मुले जेव्हा घरात खूप त्रास देतात, तेव्हा त्यांना हाताळण्याची एक अनोखी आणि विनोदी युक्ती त्याने सांगितलीे.

Riteish Deshmukh handling- kids
Avengers: Doomsday Trailer | Iron Man नाही आता विलन! 'एव्हेंजर्स डूम्सडे'मध्ये थॉर-डॉक्टर डूमची थरारक लढत; जुन्या एवेंजर्सच्या सुपरहिरोंचीही एन्ट्री

जेव्हा मुले ऐकत नाहीत, तेव्हा रितेश काय करतो? रितेशने अक्षय कुमारच्या शोमध्ये सांगितलं होतं की, रियान आणि राहिल घरात खूप मस्ती करतात. कधी कधी ते कोणाचेच ऐकत नाहीत. अशा वेळी रागावण्याऐवजी रितेश एक भन्नाट युक्ती वापरतो.

यावेळी जेनेलियाने देखील शोमध्ये उपस्थित होती. त्यावेळी ती म्हणाली की, घरामध्ये दोन्ही मुले त्रास द्यायला लागली की, रितेश नवा फंडा वापरतो. तो माझ्या आईला कॉल करतो. यानंतर, रितेश म्हणतो की, मुले पप्पा..पप्पा करू लागले की, मी जेनेलियाच्या आईला घरात बोलावतो. त्या येतात. मग मी मुलांना सांगतो की, आता पप्पा..पप्पा नाही...ग्रँड मा..ग्रँड मा म्हणा. मी निवांत रुममध्ये जाते. यानंतर जेनेलियाने खुलासा केला की, रितेश निवांत रुममध्ये जाऊन टीव्ही पाहत बसतो.

Riteish Deshmukh handling- kids
Bhooth Bangla BO Collection |अक्षय कुमार-प्रियदर्शन जोडीचा मोठा धमाका; 'भूतबंगला'ची पहिल्याच दिवशी 'भूलभुलैया २'ला धोबीपछाड?

रितेश आणि जेनेलिया नेहमीच आपल्या मुलांना भारतीय संस्कृती आणि संस्कारांची जोड देताना दिसतात. रितेश-जिनिलियाची दोन्ही मुलं राहिल आणि रियान जेव्हा कधी कॅमेरासमोर येतात, तेव्हा मीडिया समोर आवर्जून हात जोडतात आणि थँक्यू म्हणतात.

दोघांचेही नाते मातीशी घट्ट रुजावेत म्हणून टेक्नॉलॉजी असतानाही आपली संस्कृती, संस्कार आणि नीतीमुल्ये रितेश-जिनिलिया शिकवताना दिसतात. त्यामुळेच रितेश-जेनेलियासोबत त्यांच्या दोन्हीही क्यूट मुलांची चर्चा होत असते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news