

'एव्हेंजर्स: डूम्सडे'चा ट्रेलर नुकताच रिलीज झाला असून याने जगभरातील मार्वल चाहत्यांना वेड लावले आहे. सर्वांचा आवडता रॉबर्ट डाउनी ज्युनियर आता खलनायक 'डॉक्टर डूम'च्या रूपात थॉर, कॅप्टन अमेरिका आणि नवीन एव्हेंजर्सच्या टीमला भिडणार आहे. ट्रेलरमधील सर्वात धक्कादायक दृश्य म्हणजे जेव्हा डॉक्टर डूम थॉरचा वार एका हाताने रोखतो.
marvel's 'Avengers: Doomsday' trailer out
मार्वलच्या 'Avengers: Doomsday' या चित्रपटाचा पहिला ट्रेलर गुरुवारी लास वेगासमध्ये 'CinemaCon' मध्ये रिलीज करण्यात आला. यावेळी चित्रपटगृहांचे मालक, प्रसारमाध्यमांतील लोक आणि निवडक प्रेक्षक उपस्थित होते. डिसेंबरमध्ये प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाद्वारे रॉबर्ट डाउनी जुनियरचे 'मार्वल सिनेमॅटिक युनिव्हर्स'मध्ये (MCU) रि-एन्ट्री होतेय. पण यंदा रॉबर्ट 'आयर्न मॅन'म्हणून नाही तर 'डॉक्टर डूम' या खलनायकाची भूमिका साकारत आहे. या ट्रेलरने आता चित्रपट रिलीजची उत्सुकता वाढवली आहे.
कॅप्टन अमेरिकेचे पुनरागमन
या ट्रेलरमध्ये 'स्टीव्ह रॉजर्स'ची वापसी झालेली दिसते. चित्रपटात आता एवेंजर्स आपल्या सर्वात खतरनाक शत्रूशी लढताना दिसणार आहे. 'स्टीव्ह रॉजर्स' (कॅप्टन अमेरिका) ट्रेलरमध्ये तो पुन्हा एकदा ढाल हाती घेऊन मैदानात उतरताना दिसत आहे. जुन्या एव्हेंजर्सची टीम आणि नवीन पिढीचे सुपरहिरोज मिळून डॉक्टर डूमचा मुकाबला कसा करणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
'एवेंजर्स डूम्सडे' च्या खास झलकमध्ये काय?
'एवेंजर्स डूम्सडे' चित्रपट डिसेंबरमध्ये चित्रपटगृहात रिलीज होईल. ट्रेलरमध्ये डॉक्टर डूमच्या एन्ट्रीच्या आधीच लूक दाखवण्यात आला आहे. सोबतच जुन्या एवेंजर्सचे अनेक सुपरहिरो देखील दिसणार आहेत.
ट्रेलरची सुरुवात एका व्हॉईसओवरने होते. त्यामध्ये अशी घोषणा करना ऐकू येते की: "काहीतरी येत आहे!" यानंतर प्रकाशाचा एक लख्ख झोत चमकतो आणि त्यानंतरचे दृश्य बदलते. यात रॉबर्ट डाउनी जुनियर यांची 'Doctor Doom' या भूमिकेतील, चांदीचा मुखवटा परिधान केलेली पहिली झलक पाहायला मिळते.
त्यानंतर, पेड्रो पास्कल (Mister Fantastic), सेबॅस्टियन स्टॅन (Bucky), फ्लोरेन्स प्यू (Yelena), व्हॅनेसा कर्बी (Sue Storm), ख्रिस हेम्सवर्थ (Thor), लेटिशिया राईट (Shuri), जोसेफ क्विन (Johnny Storm), टेनोच हुएर्ता (Namor) चॅनिंग टॅटम (Gambit), पॅट्रिक स्टुअर्ट (Professor X), जेम्स मार्सडेन (Cyclops) या कलाकारांची झलक दाखवण्यात आली आहे.
त्यानंतर, 'डूम'विरुद्धच्या लढाईत ख्रिस हेम्सवर्थचा 'थॉर' येतो. आपल्या धारातीर्थी पडलेल्या सहकारी 'एव्हेंजर्स'बद्दल बोलताना तो म्हणतो, "शत्रू आणि संकटांचा सामना करतानाच त्यांना वीरमरण आले. जर आपण एकजुटीने उभे राहिलो नाही, तर त्यांनी केलेले सर्व बलिदान व्यर्थ ठरेल." परंतु, जेव्हा थॉर आपले 'स्टॉर्मब्रेकर' वापरून डूमवर हल्ला करण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा तो महाखलनायक त्याला अगदी सहजपणे रोखून धरतो.