red notice
red notice

‘रेड नोटिस’ : नेटफ्लिक्सवर सर्वाधिक पाहिला गेलेला चित्रपट

Published on

पुढारी ऑनलाईन

हॉलीवूडचा चित्रपट 'रेड नोटिस'ने नेटफ्लिक्स या ओटीटीवर एक विक्रम स्वतःच्या नावावर नोंदवला आहे. इतर चित्रपटांना मागे टाकत हा चित्रपट सर्वाधिक पाहिला गेलेला चित्रपट ठरला आहे. 'द रॉक' म्हणजेच ड्वेन जॉन्सन, गॅल गॅडोट आणि रायन रेयनॉल्डस् यांच्या या चित्रपटात प्रमुख भूमिका आहेत. हा एक अ‍ॅक्शन कॉमेडी चित्रपट आहेत. जवळपास 1,490 कोटी रुपये इतके या चित्रपटाचे बजेट आहे. पैकी ड्वेन जॉन्सन आणि गॅल गॅडोट यांना प्रत्येकी सुमारे 150 कोटी रुपये मानधन देण्यात आले आहे. हा आतापर्यंतचा सर्वात महागडा नेटफ्लिक्स ओरिजनल चित्रपट आहे. 'रेड नोटीस' आतापर्यंत नेटफ्लिक्सवर 328 दशलक्ष तास पाहिला गेला आहे. या आधी नेटफ्लिक्सवर 'बर्ड बॉक्स'हा चित्रपट 282 दशलक्ष तास पाहिला गेला होता. इंटरपोलद्वारे गुन्हेगारांना पकडण्यासाठी पोलिसांना रेड नोटीस दिली जाते. या चित्रपटातही अशीच कहाणी आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news