Raveena Tandon : ढकलू नका; भर रस्त्यात मद्यधुंद अवस्थेत रवीनाची महिलांना शिवीगाळ करत मारहाण

Raveena Tandon
Raveena Tandon
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडनच्या कारने काल शनिवारी रात्री उशिराने तीन महिलांना जोरचा धक्का दिला. यानंतर तीन महिलांना तिला जाब विचारला असता तिने शिवीगाळ करत मारहाण केल्याचा आरोप लावला आहे. ही घटना मुंबईतील वांद्रे परिसरात घडली आहे. यावेळी स्थानिक नागरिकांनी रविीना आणि तिच्या कार ड्राइव्हर भोवती गर्दी केल्याचेही दिसत आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रवीनाच्या कार ड्राइव्हरने मुंबईतील रिझवी कॉलेजजवळील कार्टर रोडवर तीन महिलांना जोराचा धक्का दिला. या घटनेनंतर त्या महिलांनी आणि तेथील स्ठानक नागरिकांनी तिला जाब विचारण्यासाठी खूपच गर्दी केली. यावेळी रवीना मद्यधुंद अवस्थेत कारमधून बाहेर आली आणि त्या महिलांना शिवीगाळ करत मारहाण केली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

दरम्यान रवीनाने तेथील नागरिकांना 'या घटनेचा व्हिडिओ काढू नका', 'ढकलू नका', 'कृपया मला मारू नका'. असेही म्हटलं आहे. तर कारने धक्का दिलेल्या महिलांनी "तुला आजची रात्र तुरुंगातच काढावी लागेल. माझ्या नाकातून रक्त येतंय" असेही म्हटलं आहे.

मोहम्मद नावाच्या एका व्यक्तीने म्हटलं आहे की, "माझी आई, बहीण आणि भाची हे रिझवी कॉलेजजवळून जात असताना रवीनाची कारने धक्का दिला. सुरूवातीला ड्राइव्हरने माझ्या भाचीला आणि आईला शिवीगाळ केली. नंतर रवीनासुद्धा कारमधून बाहेर येत माझ्या आईवर हात उचलला. माझ्या आईच्या डोक्याला मार लागला आहे. आई आणि भाचीसह खार पोलीस ठाण्यात चार तास थांबल्यावर सुद्धा पोलिसांनी तक्रार दाखल केलेली नव्हती."

या घटनेनंतर रवीना काही वेळाने तिच्या घरी गेली आणि तिच्या पती प्रसिद्ध ड्रिस्ट्रीब्युटर अनिल थंडानीसोबत पोलिस स्टेशनमध्ये आली. यानंतर या घटनेविषयी त्या महिलांच्या कुटुंबीयांशी बोलून प्रकरण सोडवण्याचा प्रयत्न केला. दरम्यान रवीनाने कोणताही तिची प्रतिक्रिया दिलेली नाही. दरम्यान कार पार्कींग करताना महिलांना जोराचा धक्का लागल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

हेही वाचा 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news