Raveena Tandon : रविनाने लेकीसह घेतले सोमनाथाचे दर्शन (video) | पुढारी

Raveena Tandon : रविनाने लेकीसह घेतले सोमनाथाचे दर्शन (video)

पुढारी ऑनलाईन डेस्क : बारा ज्योतिर्लिंगांपैकी पहिले ज्योतिर्लिंग म्हणजे सौराष्ट्रातील सोमनाथ. अभिनेत्री रविना टंडन ( Raveena Tandon ) तिची आगामी वेब सीरिज ‘कर्मा कॉलिंग’ रीलिज होण्यापूर्वी लेक राशासह सोमनाथाचे दर्शन घेण्यासाठी मंदिरात पोहोचली. तिने आणि राशाने त्यांचे फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

संबंधित बातम्या 

व्हिडीओमध्ये दोघी मंदिरात पूजा-अर्चा करताना दिसतात. दोघींनी कपाळावर शिव तिलकही लावले होते. रविनाने कॅप्शनमध्ये महामृत्युंजय मंत्र शेअर केला आहे. राशाने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर मंदिराचे काही फोटोही पोस्ट केले आहेत. तिचे हे फोटो इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. रविना अनेकदा आपल्या मुलीसोबत मंदिरात जाताना दिसते. काही दिवसांपूर्वी या दोघीही तामिळनाडूतील ज्योतिर्लिंग रामेश्वरम मंदिरात गेल्या होत्या.

संबंधित बातम्या

रविना टंडन ‘कर्मा कॉलिंग’ या वेब सीरिजमध्ये इंद्राणी कोठारीची भूमिका साकारणार आहे. ग्लिट्ज, ग्लॅमर, फसवणूक आणि विश्वासघाताची ही कथा रुचि नरेन यांनी दिग्दर्शित केली आहे. राशा थडानी अभिषेक कपूरच्या पुढील चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण करणार आहे. या चित्रपटात अजय देवगणचा पुतण्या अमन देवगण मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या अॅक्शन-अॅडव्हेंचर चित्रपटात अजय देवगणही महत्त्वाच्या भूमिकेत असेल. रीलिजच्या तारखेबाबत बरीच अटकळ बांधली जात असली, तरी हा चित्रपट ९ फेब्रुवारी २०२४ रोजी प्रदर्शित होईल, अशी अपेक्षा आहे.

Back to top button