

रॅपर बादशहाने आपल्या इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये दोघांमधील शानदार केमिस्ट्री पाहायला मिळत आहे. बादशहाने काही खास रोमँटिक फोटो अपलोड केले आहेत, ज्यामध्ये दोघांची स्पष्ट बॉन्डींग दिसत आहे.
हे फोटो शेअर करताना बादशहाने कॅप्शनमध्ये लिहिलं, "Tum Yun Mile Ho". या कॅप्शनमुळे फॅन्सचे लक्ष वेधून घेतले आहे. पण त्या लकी गर्लचे नाव समोर आलेले नाही. एका फोटोमध्ये दोघे गाडीवर बसलेले दिसतात. दुसऱ्या फोटोत दोघे एका भिंतीला टेकून उभारलेले दिसतात. तर आणखी एका फोटोत दोघांनी एकमेकांचा हात हातात धरलेला दिसतो. त्यामुळे चाहत्यांनी बादशहा बाबत तर्क-वितर्क लावायला सुरुवात केली.
काहींनी म्हटलंय की, तो आगामी प्रोजेक्टच्या तयारीत असेल. ज्याचे बीटीएस मोमेंट त्याने शेअर केले आहेत. बादशहाने त्याआधी एक व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला होता. ज्यामध्ये तूम यू मिले हो चे बीटीएस शेअर केले होते. आता नेमके ते फोटो कशा संबंधित आहेत, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
दरम्यान, पंजाबी अभिनेत्री ईशा रिखी तिच्या आणि रॅपर बादशाहच्या लग्नाचे फोटो इंटरनेटवर व्हायरल झाले होते. हे फोटो सोशल मीडियावर समोर आल्यानंतर बादशाह आणि ईशा दोघांनीही बराच काळ त्यांच्या नात्याबद्दल मौन बाळगले होते. त्यामुळे चाहते संभ्रमात पडले होते.
ईशा रिखीने बादशाहसोबतच्या लग्नाला दुजोरा दिला
इन्स्टाग्रामवरील 'आस्क मी एनीथिंग' (AMA) सत्रादरम्यान, ईशा रिखीने तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल भाष्य केले आणि बादशाहसोबत तिचे लग्न झाल्याचे स्पष्ट केले होते. इन्स्टाग्रामवरील 'आस्क मी एनीथिंग' सेशनदरम्यान, ईशाने स्पष्ट केले होते की, तिला तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल अनेक प्रश्न विचारले गेले होते. याला उत्तर देताना ईशा म्हणाली, "मला वाटते की अशा प्रश्नांचा आता भडिमारच झाला आहे. 'तुमचे लग्न झाले आहे का?', 'तुमचे बादशाहसोबत लग्न झाले आहे का?', 'तुम्ही एकमेकांना फॉलो का करत नाही?', 'तुम्ही एकत्र फोटो का पोस्ट करत नाही?'