Tamilnadu CM Joseph Vijay |'अभिनेत्याचा पक्ष' म्हणून हिणवणाऱ्यांना चोख प्रत्युत्तर, विजय यांचा 'सिनेमॅटिक' व्हिडिओ व्हायरल

Tamilnadu CM Joseph Vijay |'एका अभिनेत्याचा पक्ष' म्हणून हिणवणाऱ्या टीकाकारांना चोख प्रत्युत्तर, मुख्यमंत्री विजय यांचा भाषणानंतरचा 'सिनेमॅटिक' स्टाईलचा व्हिडिओ व्हायरल
Tamilnadu CM Joseph Vijay
Chennai- Tamil Nadu Chief Minister C Joseph Vijay seeks permission from the Speaker and performs a cinematic gesture in the State Assembly.Pudhari photo
Published on
Updated on
Summary

तामिळनाडूचे मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय यांनी विधानसभेतील भाषण संपवल्यानंतर अध्यक्षांची परवानगी घेऊन केलेला खास हावभाव सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. त्यांच्या या कृतीमुळे राजकारण आणि सिनेसृष्टीतील त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची झलक पुन्हा एकदा पाहायला मिळाली. समर्थकांकडून या व्हिडिओला मोठा प्रतिसाद मिळत असून विजय यांच्या वेगळ्या शैलीची चर्चा सुरू आहे.

चेन्नई: तामिळनाडूचे मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय यांनी विधानसभेत आपले भाषण संपवताना अध्यक्षांची परवानगी घेतली आणि एक 'सिनेमॅटिक' हावभाव केला. त्यानंतर त्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. राजकीय आणि अभिनय शैली यांची सांगड घालत सी जोसेफ विजय यांनी आपली स्टाईलही कायम ठेवली.

तामिळनाडूचे मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय पुन्हा एकदा त्यांच्या वेगळ्या अंदाजामुळे चर्चेत आले आहेत. विधानसभेतील भाषण संपल्यानंतर त्यांनी केलेल्या एका खास हावभावाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. राजकारणात सक्रिय भूमिका बजावत असतानाही विजय यांनी आपल्या लोकप्रिय सिनेमॅटिक शैलीची छाप कायम ठेवली असल्याचे या घटनेतून दिसून आले.

मिळालेल्या माहितीनुसार, विधानसभेत एका महत्त्वाच्या विषयावर भाषण केल्यानंतर विजय यांनी सभागृहाच्या अध्यक्षांची परवानगी घेतली. त्यानंतर त्यांनी चाहत्यांमध्ये माहिती असलेला एक खास हावभाव केला. या क्षणाला सभागृहातील सदस्यांसह उपस्थितांनी दाद दिली. सर्वांनी हास्याने चिअर केले आणि टाळ्यांचा कडकडाट देखील झाला. काही क्षणांतच या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि विविध प्लॅटफॉर्मवर त्याची चर्चा सुरू झाली.

भाषणादरम्यान, त्यांनी माजी मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन हँड-स्लॅशिंग व्हायरल झालेली कृती देखील हुबेहूब करून दाखवली. यामुळे सर्वांचे लक्ष वेधले गेले आणि सभागृहात चर्चा सुरू झाली. अत्यंत महत्त्वाच्या अशा विधिमंडळ अधिवेशनादरम्यान, मुख्यमंत्री विजय यांनी आपल्या सरकारच्या सुरुवातीच्या निर्णयांचे जोरदार समर्थन केले आणि आपल्या प्रशासनाला केवळ 'एका अभिनेत्याचा पक्ष' म्हणून हिणवणाऱ्या टीकाकारांना चोख प्रत्युत्तर दिले.

विधानसभेतील एका भाषणात विजय म्हणाले की, "काही लोक म्हणतात की मी थेट चित्रपटाच्या शूटिंग सेटवरून मुख्यमंत्री झालो. त्यांच्याच भाषेत सांगायचे तर, तो केवळ एक 'रील' (चित्रपटाचा भाग) आहे. बहुतेक लोक आधी राजकीय पक्ष स्थापन करतात आणि मग लोकांकडे जातात. आम्ही आधी लोकांकडे गेलो आणि त्यानंतरच आमचा पक्ष स्थापन केला. ज्यांना हे समजत नाही, तेच आम्हाला केवळ 'एका अभिनेत्याचा पक्ष' म्हणून कमी लेखतात. २०२६ च्या निवडणुकीत आम्ही कोणत्याही युतीशिवाय स्वतंत्रपणे निवडणूक लढलो."

एम के स्टॅलिन यांची स्टाईलची हुबेहुब नक्कल

भाषण संपवताना त्यांनी परवानगी घेतली आणि एम. के. स्टॅलिन यांची 'viral hand-slashing move' ची हुबेहुब नक्कल केली. हे दृश्य अत्यंत नाट्यमय होते आणि त्यामुळे सोशल मीडियावर मोठी चर्चा रंगली.

शिवाय त्यांनी करूर येथील चेंगराचेंगरीच्या घटनेबाबत पक्षावर झालेल्या आरोपांचे खंडन केले. ते म्हणाले, करूरमध्ये ४१ जणांचा मृत्यू झाला आणि त्याचे खापर आमच्यावर फोडण्यात आले. असे राजकारण का केले गेले? त्यांनी तामिळनाडूच्या जनतेचे आभार मानले आणि त्यांची सेवा करणे हीच आपल्या सरकारची जबाबदारी असल्याचे म्हटले. विजय यांच्या नेतृत्वाखालील हे सरकार अत्यंत सामान्य लोकांचे सरकार असल्याचेही त्यांनी नमूद केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news