
Rapper Badshah surprisal Body Transformation weight loss
मुंबई : वाढलेल्या वजनाने त्रस्त रॅपर बादशाहचा एक व्हिडिओ इन्स्टाग्रामवर व्हायरल होत आहे. ते पाहून अनेकांनी म्हटलं की, त्याने औषधं घेतली आहे. पण, मुळात त्याने कोणतेही डाएट फॉलो केलेलं नाही. आणि वजन कमी करण्याची औषधे देखील घेतलेली नाही. आता यामागील रहस्य बादशाहने सांगितले आहे की, कशा प्रकारे त्याचे वजन झटकन उतरलं!
बादशाहचे कमलीचे ट्रान्सफॉर्मेशन समोर आले आहे. करण जोहर, कपिल शर्मा, ज्युनियर एनटीआर आणि आता रॅपर बादशाहचे कमालीचे ट्रान्सफॉर्मेशन पाहायला मिळत आहे. ते पाहून फॅन्सना धक्काच बसला आहे. काही जण म्हणताहेत की , खरच त्याने वेट लॉस मेडिसीन घेतलं असावं. पण आता रॅपरने याबाबत खुलासा केला आहे की, त्याने अशा प्रकारच्या कोणत्याची गोष्टी केलेल्या नाहीत. तुम्ही अन्न किती प्रमाणात खाता, यावर वजन वाढणे वा कमी होणे अवलंबून आहे.
रॅपर बादशाहचा एक व्हिडिओ समोर आला आहे. एका मुलाखतीत त्याने जलद गतीने वजन कमी होण्यामागील कारण सांगितले. अधिक वजनामुळे त्याला स्लीप एपनिया झाला होता. पण, त्याने ही गोष्ट गंभीरपणे घेऊन डाएट, वर्कआऊट, स्लीप रूटीन याचे वेळापत्रक फॉलो केले. सोबतचं हेदेखील आवश्यक आहे की, योग्य वेळेत आणि योग्य पोर्शनमध्ये अन्न खाणे यामुळे वजन कमी होण्यास मदत मिळली.
रिपोर्ट्सनुसार, अधिक डाएटिंग मुळे तो सुस्त होऊ लागला होता. त्याला खूप लवकर भूख लागायची. जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर डाएट पोर्शन कंट्रोल करणं खूप गरजेचं आहे.
थोडे-थोडे करून खावे. त्यामुळे दिवसभर ऊर्जा टिकून राहिल. ज्यामुळे भूख कमी लागते. ब्लड शुगर लेव्हल देखील सामान्य राहू शकते. जेवणाच्या अर्धा तास आधी दोन ग्लास पाणी प्यावे, ज्यामुळे अधिक खाल्ले जाणार नाही. कंट्रोल पोर्शनचे प्रॅक्टिस करण्याचे सर्वात सहज उपाय म्हणजे छोट्या प्लेट्स आणि वाटमध्ये खाणे.
तीव्र घोरणे, झोपताना श्वास थांबून थांबून घेणे वा श्वास थांबणे, दिवसभरात अशक्तपणा आणि झोप न येणे, लक्ष केंद्रीत न होणे, उच्च रक्तदाब, चिडचिड होणे
अधिक वजन, कौटुंबिक इतिहास, जन्मत: समस्या, हार्मोनल असंतुलन, मद्यसेवन, धूम्रपान आदी.