Movie April May 99 | वडील मुलीच्या नात्यातील जिव्हाळा घेऊन येताहेत आशुतोष गोवारीकर

Movie April May 99 Ashutosh Gowariker | आशुतोष गोवारीकर 'एप्रिल मे ९९' चित्रपटामध्ये झळकणार आहेत
image of Movie April May 99
Ashutosh Gowariker role in the Movie April May 99Instagram
Published on
Updated on

Ashutosh Gowariker role in the Movie April May 99

मुंबई - उन्हाळ्यांच्या सुट्ट्यांची आठवण करून देणारा 'एप्रिल मे ९९' येत्या २३ मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहात असतानाच आता या चित्रपटातील आणखी एक कलाकार समोर आला आहे. या चित्रपटात प्रसिद्ध दिग्दर्शक आणि अभिनेते आशुतोष गोवारीकर एका महत्वपूर्ण भूमिकेत झळकणार आहेत. त्यामुळे आता या चित्रपटाची उत्सुकता अधिकच वाढली आहे.

image of Movie April May 99
Cannes 2025 | कान्समध्ये झळकला ‘खालिद का शिवाजी’ चित्रपट

नुकत्याच प्रदर्शित झालेल्या पोस्टरमध्ये श्रीकांत खेडेकर आणि जाई खेडेकर दिसत आलेत. वडील मुलीच्या नात्यातील जिव्हाळा यात दिसतोय. जुन्या काळातील लँडलाईन फोनवरून होत असलेला त्यांचा हा संवाद एका गोड, भावनिक कथेची झलक देतो. ‘एप्रिल मे ९९’ ही कथा १९९९ सालातील पार्श्वभूमीवर आधारित असून, काळाच्या ओघात हरवलेल्या नात्यांच्या आणि आठवणींच्या गुंफणीतून प्रेक्षकांना एक भावनिक सफर घडवून आणणार आहे.

image of Movie April May 99
Girija Prabhu | कोण होतीस तू, काय झालीस तू मालिकेतील सीनसाठी गिरीजा उतरली चिखलात

मापुस्कर ब्रदर्स इन असोसिएशन फिंगर प्रिंट फिल्म्स, नेक्सस अलायन्स, थिंक टँक आणि मॅगीज पिक्चर्स प्रस्तुत 'एप्रिल मे ९९’ या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन रोहन मापुस्कर यांनी केले आहे. राजेश मापुस्कर, मधुकर कोटीयन, जोगेश भूटानी , मॉरिस नून हे निर्माते आहेत तर लॉरेन्स डिसोझा सह निर्माते आहेत. यात आर्यन मेंगजी, श्रेयस थोरात आणि मंथन काणेकर आणि साजिरी जोशी यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news