Ranveer Singh Bishnoi Gang Threat: फक्त रणवीरच नाही तर त्याच्या संपूर्ण स्टाफला... बिश्नोई गँगनं दिली नवी धमकी

बिश्नोई गँगशी संबंधित असलेल्या एका अनोळखी व्यक्तीनं याबाबतची व्हॉईस नोट पाठवली
Ranveer Singh Bishnoi Gang Threat
Ranveer Singh Bishnoi Gang Threatpudhari photo
Published on
Updated on

Ranveer Singh Staff Bishnoi Gang Fresh Threat: बॉलीवूड अभिनेता रणवीर सिंह याला आज (दि. १३) पुन्हा एकदा बिश्नोई गँगकडून धमकी मिळाली आहे. या धमकीत त्यांनी ते फक्त रणवीर सिंहलाच नाही तर पूर्ण स्टाफला देखील टार्गेट करणार असल्याचं म्हटलं आहे. बिश्नोई गँगशी संबंधित असलेल्या एका अनोळखी व्यक्तीनं याबाबतची व्हॉईस नोट पाठवली आहे. यबाबतची माहिती हिंदूस्तान टाईम्सनं दिली आहे.

Ranveer Singh Bishnoi Gang Threat
Ranveer Singh: कांतारातील देवीचा अपमान? रणवीर सिंहच्या वक्तव्यावर लोकांचा संताप; नंतर मागितली माफी Video

शब्द न पाळण्याची शिक्षा..

या व्हॉईस नोटमध्ये संबंधित व्यक्ती हा, 'शब्द न पाळण्याची शिक्षा काय असते हे तुला आता सांगणार.' असं म्हणताना दिसत आहे. याचबरोबर संबंधित अनोळखी व्यक्ती हा रोहित शेट्टीचा देखील उल्लेख करताना दिसतो. तो म्हणतो, 'लाईनवर या जर आला नाही तर मग पाहा आम्ही लोक काय करू शकतो ते.'

Ranveer Singh Bishnoi Gang Threat
Delhi Blast Ranveer singh Dhurandhar | रणवीरच्या 'धुरंधर'ची ट्रेलर रिलीज डेट टळली, निर्मात्यांनी दिली महत्त्वाची अपडेट

दादर पोलिसांना पत्र

रणवीर सिंह आणि दीपिका पदुकोन यांना एका दिवसापूर्वीच धमकी आली होती. त्यानंतर त्यांनी आपली सुरक्षा वाढवली होती. मुंबईतील त्यांच्या घराबाहेर देखील सुरक्षा वाढवण्यात आली होती. दादर पोलिस ठाण्याला हाऊसिंग कॉम्पेक्सने एक अधिकृत पत्र लिहिलं आहे. त्यानुसार रणवीर सिंह आणि दीपिका पदुकोण यांनी घराबाहेर शसस्त्र बंदोबस्त ठेवला आहे.

Ranveer Singh Bishnoi Gang Threat
Gang leader arrested | तडीपार झालेल्या गब्बर गँगचा म्होरक्या जेरबंद

स्टाफ रडारवर

दरम्यान, व्हॉईस नोट पाठवणार व्यक्ती हा रणवीर सिंह याला इजा पोहचवण्याऐवजी त्यांच्या स्टाफला इजा पोहचवणार असं देखील म्हणतोय. 'रणवीर सिंह तुला सल्ला द्यायला खूप आवडतं ना तू लोकांना पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार देण्यास सांगतोस. ठीक आहे तू हे कर काही प्रॉब्लेम नाही.'

कोण कधी येतं कधी जातं सर्व....

धमकी देणारा अनोळखी व्यक्ती व्हॉईस नोटमध्ये पुढे म्हणतो, 'आता माझं ऐक. तुझ्या हाताखाली जे कोणी काम करत आहेत. मॅनेजर, स्टाफ सर्वांची डिटेल माहिती आमच्याकडे आहे. ते कुठं राहतात, ते कधी ऑफिसला येतात, ते केव्हा घरी जातात, त्यांचे कुटुंबीय कुठं राहतात. आमच्याकडे सर्व माहिती आहे. आम्ही तुला थेट काही सांगणार नाही. आम्ही त्यांना इजा पोहचवण्यास सुरूवात करू. त्यावेळी तुला अक्कल येईल.'

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news