

कोल्हापूर : दोन वर्षांसाठी तडीपार सदर बाजार परिसरातील गब्बर गँगचा म्होरक्या रोहन ऊर्फ टिल्या सुहास होळकर (वय 24, रा. सदर बाजार, कोल्हापूर) यास शाहूपुरी पोलिसांनी शनिवारी जेरबंद केले. तडीपार आदेशाचे उल्लंघन करून संशयित वावरत असताना त्याला सदर बाजार परिसरातून ताब्यात घेण्यात आले.
रोहन विरुद्ध शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. त्याची बिंदू चौक येथील सबजेलमध्ये रवानगी करण्यात आली. पोलिस निरीक्षक संतोष डोके यांच्या पथकाने ही कारवाई केली. खुनाच्या प्रयत्नासह गंभीर गुन्ह्यांचे रेकॉर्ड असलेल्या होळकरसह त्याच्या साथीदारांना जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार केले होते. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात कोम्बिंग ऑपरेशन करून गुन्हेगारांची झडती घेण्यात येत आहे. होळकर सदर बाजार परिसरात असल्याची माहिती मिळताच सापळा रचून त्यास ताब्यात घेण्यात आले. त्याच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली. न्यायालयाने त्याला न्यायालीन कोठडी सुनावली.