पुढारी ऑनलाईन डेस्क - रणबीर कपूरचा चित्रपट रामायण पार्ट-१ आणि पार्ट-२ च्या घोषणेसोबत चित्रपटाची रिलीज डेट समोर आली आहे. रणबीर कपूर आणि साई पल्लवी स्टारर चित्रपट 'रामायण'च्या घोषणेची प्रतीक्षा संपली आहे. चित्रपट रामायणच्या निर्मात्यांनी आज ६ नोव्हेंबर रोजी ही घोषणा केलीय. रामायण पार्ट १ आणि रामायण पार्ट २ ची देखील घोषणा केली आहे. यापेक्षाही मोठी न्यूज ही आहे की, रामायण पार्ट १ आणि पार्ट २ च्या रिलीज डेटची देखील घोषणा केली आहे. रामायण चित्रपटाच्या घोषणेची गूडन्यूज स्वत: प्रोड्यूसर नमित मल्होत्राने दिली आहे.
नमित मल्होत्राने आपल्या सोशल मीडिया हँडलवर एक चित्रपट रामायण चित्रपटाचा भाग १ आणि भाग २ चीदेखील घोषणा केली आहे. नमित मल्होत्रा यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिलं- '१० वर्षांपेक्षादेखील अधिक कालावधीपासून मी ही कहाणी पडद्यावर आणण्याची तयारी करत आहे. जी ५ हजार वर्षांहून अधिक लाखों-कोटी लोकांच्या मनावर राज्य करत आली आहे. आज मी ही घोषमा करून खूप खुश आहे. आमची टीम न थकता न थांबता काम करत आहे. हा चित्रपट तुम्हाला नवा सिनेमा, इतिहास, आमचे सत्य, आमची संस्कृती, आमचे रामायण...तयार आहे. तर या आणि आमच्या या प्रवासात सहभागी व्हा आणि हे स्वप्न साकार करण्यासाठी आणि अभिमानाने मोठ्या चित्रपटाच्या प्रतीक्षेत राहा. पार्ट १ दिवाळी २०२६ आणि पार्ट २ हा २०२७ मध्ये रिलीज होणार आहे, आमची संपूर्ण 'रामायण' फॅमिलीकडून तुम्हा सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा'.
सोबतच त्यांनी रामायणचे एक पोस्टर शेअर किेले आहे. चित्रपट रामायण पार्ट १ आणि २ हे २०२६ आणि २०२७ क्रमश: रिलीज होणार आहे. नमित मल्होत्रा चित्रपट रामायणची निर्मिती करत आहेत. आणि चित्रपट दंगलचे दिग्दर्शक रामायण दिग्दर्शित करत आहेत. चित्रपट रामायणच्या सेटवरून रणबीर कपूर-साई पल्लवीचा फर्स्ट लूकदेखील व्हायरल झाला होता.