

दिग्पाल लांजेकर यांच्या ‘रणपति शिवराय स्वारी आग्रा’ या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला असून, छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्रा स्वारीतील धैर्य, बुद्धिमत्ता आणि स्वाभिमानाची झलक त्यात दिसून येते. टीझरने इतिहासप्रेमी प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्साह निर्माण केला आहे.
Ranapati Shivray Swari Agra Teaser out now
मराठी सिनेसृष्टीतील ऐतिहासिक चित्रपटांचा प्रवास अधिक भव्य करणारे दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. त्यांच्या आगामी चित्रपट 'रणपति शिवराय स्वारी आग्रा'चा दमदार टीझर नुकताच प्रदर्शित करण्यात आला असून, सोशल मीडियावर या टीझरची जोरदार चर्चा सुरू आहे. हा चित्रपट श्री शिवराज अष्टकातील सहावे पुष्प आहे. याआधीच्या सर्व चित्रपटांनी चांगले यश मिळवले आहे. त्यामुळे 'रणपति शिवराय स्वारी आग्रा'ची उत्सुकता सर्वांना लागून राहिली आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य उभारणीत बुद्धिचातुर्य, त्यांचा शूर पराक्रम हा त्यांच्या कार्याचा केंद्रबिंदू राहिला आहे. छत्रपती शिवाजी महाराज मुत्सद्दी योद्धे होते. ते असंख्य मोहिमांमधून सिद्ध झाले आहे. महाराजांनी गनिमी कावाची कूटनीती ज्याप्रकारे प्रभावीपणे वापरली. शत्रू सावध नसतानाच त्याच्यावर घाला घातला. औरंगजेबाचं मुघल साम्राज्य सर्वात मोठं आणि मजबूत साम्राज्य मानलं जायचं. पण त्याचा देखील बिमोड केला. अशा या साम्राज्याला शिवाजी महाराजांनी केवळ जोरदार हादराच दिला नाही, तर मुघल सम्राट औरंगजेबाची झोपही उडवली.
आग्य्राला जाण्याचं निश्चित करणं आणि भर दरबारात मुघल साम्राज्याला आव्हान देणं हा स्वराज्याच्या उभारणीतील महत्त्वाचा अध्याय आहे. या रणनीतीमध्ये रक्ताचा एकही थेंब न सांडता अगदी बुद्धी चातुर्याने शत्रूचा बिमोड ज्या प्रकारे केला, हे गुण फकत महाराजांमध्ये होते. शिवचरित्रातील हा थरारक अध्याय ‘रणपति शिवराय स्वारी आग्रा’ भव्य चित्रपटातून शिवजयंतीदिनी १९ फेब्रुवारीला समोर येणार आहे.
टीझरमध्ये काय?
औरंगजेबाच्या बलाढ्य मुघलसत्तेचा पोलादी पहारा महाराजांनी भेदला होता. औरंगजेबाच्या दरबारातील बाणेदार प्रसंगाची रोमांचकारी झलक टीझरमध्ये दाखवण्यात आलीय.
पॅनोरमा स्टुडिओज आणि मुगाफी निर्मित चित्रपटाचे लेखन-दिग्दर्शन दिग्पाल लांजेकर यांनी केले आहे. कुमार मंगत पाठक, अभिषेक पाठक, विपुल अग्रवाल, जेनील परमार, मुरलीधर छतवानी, चित्रपटाचे निर्माते आहेत. सहनिर्माते रवींद्र औटी, तान्शा बत्रा, आलोक शर्मा आहेत. पॅनोरमा स्टुडिओज या चित्रपटाचे जगभरात वितरण करणार आहे.