

Border 2 च्या टीझरमध्ये सनी देओल पुन्हा एकदा आपल्या दमदार आवाजात भारतीय सैन्याची ताकद दाखवताना दिसत आहे. ‘कुठूनही घुसण्याचा प्रयत्न करा, समोर हिंदुस्तानी सैन्यच दिसणार’ हा डायलॉग प्रेक्षकांच्या अंगावर काटा आणत असून चित्रपटाबाबत प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.
Border 2 Teaser release now
बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय देशभक्तीपटांपैकी एक असलेल्या Border चित्रपटाचा सिक्वेल बॉर्डर-२ अखेर प्रेक्षकांसमोर येण्याच्या तयारीत आहे. नुकताच या चित्रपटाचा दमदार टीझर रिलीज करण्यात आला असून, त्यामध्ये सनी देओलचा आक्रमक आणि देशभक्तीने ओतप्रोत अंदाज पुन्हा एकदा पाहायला मिळतो. टीझरमध्ये भारतीय सैन्याची ताकद, शिस्त आणि बलिदान अधोरेखित करण्यात आले आहे.
आज विजय दिनाच्या औचित्याने Border 2 चा टीजर रिलीज करण्यात आला आहे. त्यामध्ये सनी देओल, अहान शेट्टी, वरुण धवन यासारखे दिग्गज स्टार्स दिसत आहे. १९९७ रोजी रिलीज झालेला अक्षय खन्ना स्टारर चित्रपट 'बॉर्डर'चा हा सीक्वल ‘बॉर्डर २’ आता २३ जानेवारी २०२६ रोजी चित्रपटगृहात धुमाकूळ घालायला तयार आहे.
आज १६ डिसेंबर विजय दिनाच्या औचित्याने टीजर रिलीज करण्यात आला आहे. १६ डिसेंबर, १९७१ रोजी इतिहासात तो दिवस भारतीय सैन्याच्या शौर्यासमोर ९३,००० पाकिस्तानी सैनिकांनी आत्मसमर्पण केल्याचा दिवस म्हणून लक्षात ठेवला जातो.
टीझरची सुरुवात सैनिकांवर हल्ला करणाऱ्या युद्धाच्या दृश्याने होते. सनी देओल म्हणतो, "तुम्ही जिथे जिथे प्रवेश करण्याचा प्रयत्न कराल, आकाशातून, जमिनीवरून, समुद्रातून, तुम्हाला एक भारतीय सैनिक तुमच्या समोर उभा असलेला दिसेल, जो आमच्या डोळ्यात पाहत छाती ठोकत म्हणतो, 'जर तुमच्यात हिंमत असेल तर या... हा भारत उभा आहे.'" सनीच्या संवादासोबत अशी गर्जना आहे की, सिंहाचा आवाजही शांत होईल. चित्रपटाच्या टीझरमध्ये भारत-पाकिस्तान युद्धातील काही भयानक दृश्ये दाखवण्यात आली आहेत, ज्यामध्ये आपले सैनिक त्यांचे शौर्य दाखवताना दिसतात.
देशभरातील विविध शहरांमध्ये स्क्रीनिंग
टीजर लाँच कार्यक्रम देशभरातील विविध शहरांमध्ये आयोजित करण्यात आला होता आणि दिल्ली, मुंबई, चंदीगड आणि हैदराबादसह विविध ठिकाणी त्याचे स्क्रीनिंग करण्यात आले होते. टीझर पाहिल्यानंतर लोक आधीच म्हणू लागले आहेत की, "बॉर्डर २ रेकॉर्ड तोडेल."