Ramayana Trailer: ब्रह्ममुहूर्तावर 'रामायण'चा ट्रेलर रिलीज; मर्यादा पुरुषोत्तम राम आणि रौद्र रावणाचे रूप पाहून अंगावर काटा येईल

दिग्दर्शक नितेश तिवारी यांच्या बहुप्रतीक्षित 'रामायण पार्ट १' चित्रपटाचा ट्रेलर अखेर प्रदर्शित झाला आहे.
Ramayana Trailer
Ramayana Trailerfile photo
Published on
Updated on

Ramayana Trailer

नवी दिल्ली : दिग्दर्शक नितेश तिवारी यांच्या बहुप्रतीक्षित 'रामायण पार्ट १' चित्रपटाचा ट्रेलर अखेर प्रदर्शित झाला आहे. याआधी भगवान रामाच्या भूमिकेतील रणबीर कपूरचा लूक समोर आला होता. मात्र, आता ट्रेलरमधून रावणाच्या भूमिकेतील यशचा रौद्र अवतार प्रथमच पाहायला मिळाला असून, त्याने प्रेक्षकांचे विशेष लक्ष वेधून घेतले आहे.

चित्रपटाचा ट्रेलर सुरुवातीला २४ जुलै रोजी प्रदर्शित होणार होता. मात्र, तो पुढे ढकलण्यात आला होता. अखेर आज (दि. ३०) ब्रह्ममुहूर्तावर ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला. अवघ्या काही वेळातच तो सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, त्यातील भव्य दृश्यरचना आणि कलाकारांच्या भूमिका चर्चेचा विषय ठरत आहेत.

Ramayana Trailer
Musafir Cafe: 10 वर्षांपूर्वी लिहिलेली 'मुसाफिर कॅफे' कादंबरी आता Netflix वर; लेखक दिव्य प्रकाश दुबे यांची भावनिक पोस्ट व्हायरल

यशचे रौद्र रूप

४ मिनिटे ९ सेकंदांचा हा ट्रेलर यशने साकारलेल्या रावणाच्या दृश्याने सुरू होतो. सिंहासन मिळवण्यासाठी रक्त सांडण्यापासून ते पांढऱ्या हत्तीशी लढण्यापर्यंत, यशने रावणाचा अहंकार प्रभावीपणे साकारला आहे. यशव्यतिरिक्त, अरुण गोविल, साई पल्लवी, कैकेयी, मंथरा, रवी दुबे आणि शूर्पणखा यांचे लूकही यात समोर आले आहेत.

सीतेच्या भूमिकेत साई पल्लवीची छाप

भगवान रामाच्या भूमिकेत रणबीर कपूरच्या चेहऱ्यावरील तेज आणि संयम विशेष उठून दिसतो. तर, रामानंद सागर यांच्या 'रामायण' मालिकेत प्रभू रामाची भूमिका साकारलेले अरुण गोविल यावेळी राजा दशरथ यांच्या भूमिकेत भावनिक अभिनय करताना दिसत आहेत. सीतेच्या भूमिकेत साई पल्लवीनेही प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. शांत, संयमी आणि सोज्वळ सीतेचे रूप साकारतानाच तलवारबाजीचा तिचा प्रसंग विशेष लक्षवेधी ठरतो.

शूर्पणखेच्या प्रसंगाची झलक

ट्रेलरमध्ये शूर्पणखेचे नाक कापण्याच्या प्रसंगाचीही झलक दाखवण्यात आली आहे. शूर्पणखेच्या भूमिकेत रकुल प्रीत सिंह प्रभावी दिसत असून, लक्ष्मणाच्या भूमिकेत रवि दुबे यांचीही क्षणिक झलक पाहायला मिळते. चित्रपटातील इतर महत्त्वाच्या पात्रांची झलकही ट्रेलरमध्ये दाखवण्यात आली असून, प्रेक्षकांमध्ये चित्रपटाबाबतची उत्सुकता आणखी वाढली आहे.

Ramayana Trailer
Kangana Ranaut: कंगना रणौतने मोदींसारखा सेल्फी व्हिडिओ केला पोस्ट; 'त्या' वक्तव्याचे केले समर्थन; सोशल मीडियावर Video Viral

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news