Musafir Cafe: 10 वर्षांपूर्वी लिहिलेली 'मुसाफिर कॅफे' कादंबरी आता Netflix वर; लेखक दिव्य प्रकाश दुबे यांची भावनिक पोस्ट व्हायरल

Musafir Cafe Netflix: दहा वर्षांपूर्वी लिहिलेली 'मुसाफिर कॅफे' ही कादंबरी आता Netflix वर प्रदर्शित होत असून लेखक दिव्य प्रकाश दुबे यांनी यानिमित्ताने भावनिक पोस्ट शेअर केली आहे.
Musafir Cafe Netflix
Musafir Cafe NetflixPudhari
Published on
Updated on

Musafir Cafe Netflix: लोकप्रिय लेखक दिव्य प्रकाश दुबे यांची 'मुसाफिर कॅफे' ही कादंबरी सध्या चर्चेत आहे. तब्बल दहा वर्षांपूर्वी लिहिलेली ही कादंबरी आता Netflix च्या माध्यमातून जगभरातील प्रेक्षकांपर्यंत पोहोचत आहे. या निमित्ताने दिव्य प्रकाश दुबे यांनी सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट शेअर करत आपल्या लेखनप्रवासाच्या आठवणींना उजाळा दिला.

दुबे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले की, दहा वर्षांपूर्वी लिहिलेल्या या कादंबरीतील पात्रे एक दिवस पुस्तकाच्या पानांमधून बाहेर पडून जगभरातील प्रेक्षकांपर्यंत पोहोचतील, याची कल्पनाही केली नव्हती.

Netflix वर ही कथा साकार होण्यासाठी साथ देणाऱ्या शरण्या राजगोपाल, दिग्दर्शक रुचिर अरुण, Netflix ची संपूर्ण टीम, कलाकार, तंत्रज्ञ आणि या प्रवासात योगदान देणाऱ्या प्रत्येकाचे त्यांनी मनापासून आभार मानले.

Musafir Cafe Netflix
Jana Nayagan Box Office Collection Day 5: ‘जन नायकन’च्या कमाईत घट, बॉक्स ऑफिसवर ५ दिवसांत किती कमाई?

'सुधा', 'प्रीती' आणि 'चंदर' या आपल्या कथेतील पात्रांचा उल्लेख करताना दिव्य प्रकाश दुबे भावूक झाले. अनेकदा लेखक आपल्या पात्रांना जन्म देत नाही, उलट पात्रेच लेखकाला जिवंत ठेवतात, असे त्यांनी लिहिले.

याशिवाय, 'मुसाफिर कॅफे'ला भरभरून प्रेम देणाऱ्या लाखो वाचकांचेही त्यांनी विशेष आभार मानले. वाचकांच्या प्रेमाशिवाय हा प्रवास इतक्या मोठ्या टप्प्यावर पोहोचला नसता, असेही त्यांनी सांगितले.

Musafir Cafe Netflix
Main Wapas Aaunga OTT: 'मैं वापस आऊंगा' आता OTT वर; थिएटर गाजवल्यानंतर इम्तियाज अलींचा चित्रपट कधी आणि कुठे पाहता येणार?

पोस्टच्या शेवटी त्यांनी आपल्या पुस्तकातील एक वाक्य सांगितलं, "जीवनाचं अंतिम ध्येय एखाद्या ठिकाणी पोहोचणं नसून, प्रवास करत राहणं हे आहे." दहा वर्षांनंतर समजले की 'मुसाफिर कॅफे' हे फक्त एक पुस्तक किंवा शो नाही; तर स्वतःच्या कथांवर विश्वास ठेवण्याची एक मानसिक अवस्था आहे, असेही त्यांनी नमूद केले.

दिव्य प्रकाश दुबे यांच्या या भावनिक पोस्टला सोशल मीडियावर चांगला प्रतिसाद मिळत असून, त्यांच्या चाहत्यांकडून तसेच वाचकांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news