Ramayana Box Office Day 15: एकामागून एक विक्रम मोडले; ‘रामायण’ने बॉक्स ऑफिसवर रचला कमाईचा नवा इतिहास, किती कोटी कमावले?

Ramayana Box Office Day 15: नितेश तिवारी दिग्दर्शित ‘रामायण’ चित्रपटाने प्रदर्शनाच्या १५व्या दिवशी जगभरात १,५४७.१५ कोटी रुपयांची कमाई केली आहे.
Ramayana Box Office
Ramayana Box Office Pudhari
Published on: 
Updated on: 

Ramayana Box Office Day 15: नितेश तिवारी दिग्दर्शित ‘रामायण’ चित्रपटाची बॉक्स ऑफिसवरील घोडदौड कायम आहे. प्रदर्शनाच्या १५व्या दिवशी चित्रपटाने दमदार कमाई केली आहे. जगभरातील कमाईचा आकडा आता १,६०० कोटी रुपयांच्या जवळ पोहोचला आहे. विशेष म्हणजे, आतापर्यंत या चित्रपटाची तब्बल ३.४ कोटींहून अधिक तिकिटे विकली गेली आहेत. रणबीर कपूर, साई पल्लवी आणि यश यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाने भारतीय चित्रपटसृष्टीत अनेक नवे विक्रम केले आहेत.

१५व्या दिवशी किती कमाई?

‘सॅकनिल्क’च्या आकडेवारीनुसार, चित्रपटाने प्रदर्शनाच्या १५व्या दिवशी भारतात १९.३५ कोटी रुपयांची निव्वळ कमाई केली. शुक्रवारी देशभरातील २१,४३७ शोमधून ही कमाई झाली. चित्रपटाच्या हिंदी आवृत्तीला सर्वाधिक प्रतिसाद मिळाला.

हिंदी आवृत्तीने १४ कोटी रुपयांची कमाई केली. तर मल्याळम आवृत्तीने १.७५ कोटी, तमिळने १.५० कोटी, कन्नडने १.४० कोटी आणि तेलुगू आवृत्तीने ७० लाख रुपयांची कमाई केली.

या कमाईमुळे भारतातील चित्रपटाचे एकूण ग्रॉस कलेक्शन १,०३२.१५ कोटी रुपयांवर पोहोचले आहे. तर भारतातील निव्वळ कमाई ८६३.७५ कोटी रुपये झाली आहे. परदेशातील बाजारपेठेतही चित्रपटाची चांगली कामगिरी सुरू आहे.

१५व्या दिवशी परदेशातून पाच कोटी रुपयांची कमाई झाली. त्यामुळे परदेशातील एकूण ग्रॉस कलेक्शन ५१५ कोटी रुपयांवर पोहोचले आहे. अशा प्रकारे भारत आणि परदेशातील कमाई मिळून चित्रपटाचे जगभरातील ग्रॉस कलेक्शन १,५४७.१५ कोटी रुपये झाले आहे.

जगभरातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांमध्ये पाचवे स्थान

‘रामायण’ने जगभरातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या भारतीय चित्रपटांच्या यादीत पाचवे स्थान मिळवले आहे. या यादीत आमिर खानचा ‘दंगल’ २,०७० कोटी रुपयांच्या कमाईसह पहिल्या क्रमांकावर आहे. त्यानंतर ‘धुरंधर २’ने १,८१३.४० कोटी, ‘बाहुबली २’ने १,७८८ कोटी आणि ‘पुष्पा २’ने १,७४२ कोटी रुपयांची कमाई केली आहे.

‘रामायण’ची कमाई सध्या १,५४७.१५ कोटी रुपयांवर पोहोचली आहे. त्यामुळे आता चित्रपटाचे पुढचे लक्ष्य ‘पुष्पा २’चा १,७४२ कोटी रुपयांचा विक्रम मोडण्याचे असेल. त्यासाठी चित्रपटाला आणखी १९४.८५ कोटी रुपयांची कमाई करावी लागणार आहे.

Ramayana Box Office
Ramayana Movie Controversy: ‘रामायण’ चित्रपट अडचणीत! रावण आणि राम-लक्ष्मणांच्या चित्रणावरून हिंदू संघटनांचा संताप; बहिष्काराची मागणी

१४ दिवसांत १,५०० कोटींचा टप्पा पार

‘रामायण’ने आणखी एक मोठा विक्रम केला आहे. प्रदर्शनाच्या अवघ्या १४ दिवसांत चित्रपटाने जगभरात १,५०० कोटी रुपयांचा टप्पा पार केला. यापूर्वी ‘धुरंधर २’ला हा टप्पा गाठण्यासाठी १६ दिवस लागले होते. तर ‘पुष्पा २’ला १७ दिवस, ‘बाहुबली २’ला २० दिवस आणि ‘दंगल’ला ३० दिवस लागले होते.

१,५०० कोटींच्या क्लबमध्ये प्रवेश करणारा ‘रामायण’ हा तिसरा हिंदी चित्रपट ठरला आहे. याआधी ‘दंगल’ आणि ‘धुरंधर २’ने हा टप्पा गाठला होता.

दुसऱ्या आठवड्यातही विक्रमांची मालिका

चित्रपटाने दुसऱ्या आठवड्यातही बॉक्स ऑफिसवर आपली पकड कायम ठेवली. दुसऱ्या वीकेंडमध्ये सर्व भाषांमधून मिळून १९६ कोटी रुपयांची निव्वळ कमाई केली. यासह ‘धुरंधर २’चा १७२.७० कोटी रुपयांचा दुसऱ्या वीकेंडमधील कमाईचा विक्रम मोडला.

Ramayana Box Office
Saif Ali Khan Death Threat: तुझ्या पत्नीच्या चुकीची शिक्षा तुला भोगायला लागेल... सैफ अली खानला जीवे मारण्याची धमकी; बॉलीवूड दहशतीत

रणबीर कपूरच्या कारकिर्दीतील सर्वात मोठी ओपनिंग

‘रामायण’ने रणबीर कपूर, साई पल्लवी आणि दिग्दर्शक नितेश तिवारी यांच्या कारकिर्दीतील सर्वात मोठी ओपनिंग मिळवली आहे. चित्रपटाने पहिल्याच दिवशी भारतात ६४.८५ कोटी रुपयांची कमाई केली होती.

रणबीर कपूरच्या ‘ॲनिमल’ चित्रपटाने पहिल्या दिवशी ६३.८० कोटी रुपयांची कमाई केली होती. ‘रामायण’ने हा आकडा मागे टाकला. साई पल्लवीच्या याआधीच्या ‘अमरन’ चित्रपटाच्या ओपनिंगचा विक्रमही मागे पडला. तर नितेश तिवारी यांच्या ‘दंगल’ चित्रपटाच्या २९.७८ कोटी रुपयांच्या ओपनिंग कलेक्शनलाही ‘रामायण’ने मागे टाकले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.