Saif Ali Khan Death Threat: तुझ्या पत्नीच्या चुकीची शिक्षा तुला भोगायला लागेल... सैफ अली खानला जीवे मारण्याची धमकी; बॉलीवूड दहशतीत

ज्यानं बाबा सिद्दीकीला संपवलं त्याने सैफ अली खानला दिली धमकी दिली आहे. याबाबतचा कथित ऑडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Saif Ali Khan Death Threat
Saif Ali Khan Death Threatpudhari
Published on: 
Updated on: 

Saif Ali Khan Death Threat: बॉलीवूड अभिनेता सैफ अली खानला जीवे मारण्याची धमकी आली आहे. या धमकीचा कथित ऑडियो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याबाबत अजून अधिकृतरित्या माहिती समोर आलेली नाही. बाबा सिद्दीकी यांच्या हत्येमागे ज्याचा हात होता त्यानेच सैफ अली खानला धमकी दिल्याची माहिती समोर येत आहे. झीशान अख्तरने ही धमकी दिल्याचे बोलले जात आहे. वरील माहिती मुंबई पोलिसांमधील सूत्रांनी दिली आहे.

Saif Ali Khan Death Threat
Saif Ali Khan: सैफ अली खानने वांद्रेतील ७९७ चौरस फुटांचा फ्लॅट ४.११ कोटी रुपयांना विकला

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार तुषार कपूर आणि आयुषमान खुराणा यांना देखील या महिन्यात अशाच प्रकारच्या धमक्या आल्या आहेत. दोन्ही केसमध्ये पोलिसांनी वैभव मिश्राला या आयआयटी ग्रॅज्युएटला बंगळुरूमधून अटक केली होती. मिश्राची कोणत्याही गुन्हेगारी विश्वातील गँगशी कनेक्शन नाही. त्याने ही धमकी देण्यासाठी AI चा वापर केला होता.

Saif Ali Khan Death Threat
Kareena Kapoor : करीना कपूरच्या सौदर्याचे गुपित पतीने केले उघड, म्हणाला ती तुपाची..

सैफवरील चाकू हल्ल्याचा उल्लेख

सैफ अली खानला देण्यात आलेल्या धमकीत दोन वर्षापूर्वी त्याच्यावर झालेल्या चाकू हल्ल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. स्वतः झीशान अख्तर असलेल्या जावा करणाऱ्याने सैफ अली खानला 'तुझ्या पत्नीने करीना कपूरने जी चूक केली आहे तिची शिक्षा तुला भोगावी लागू शकते. यापूर्वी देखील चाकू लागला होता ना.. त्यावेळी परमेश्वराच्या कृपेमुळे वाचलास. आता गोळी असेल अन् तुझी देखील बाबा सिद्दीकी सारखी स्थिती होऊ शकते अशी धमकी दिली.'

Saif Ali Khan Death Threat
Amitabh Bachchan Threat : बच्चनना धमकी देणारा ढिल्लन तर भुरटा चोर

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.