Ramayan Box Office Collection : 'रामायण'ची बॉक्स ऑफिसवर घोडदौड सुरूच; सहा दिवसांत किती गल्ला जमवला ?

Ramayan Movie Collection : भारतात या चित्रपटाला प्रचंड प्रतिसाद मिळत असून परदेशातही हा चित्रपट चांगली कमाई करत आहे.
Ramayan Box Office Collection
Ramayan Box Office Collectionfile photo
Published on: 
Updated on: 

Ramayan Box Office Collection

पुढारी आॅनलाईन : भारतात दरवर्षी अनेक चित्रपट प्रदर्शित होतात. यातील बरेचसे चित्रपट बॉक्स ऑफिसवर नवनवीन विक्रम प्रस्थापित करतात , पण काही चित्रपट असे असतात जे त्यांच्या जलद कमाईने आश्चर्यचकित करतात. सध्या बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित झालेला नितेश तिवारी यांचा 'रामायण: राइज ऑफ अ लेजेंड' हा चित्रपट अशीच जलद कमाई करताना दिसत आहे.

चित्रपट प्रदर्शनाच्या सहाव्या दिवसातच या चित्रपटाने जगभरात तुफान कमाई केली आहे. जगभरात आतापर्यंत या चित्रपटाने ८०० कोटी रुपयांपेक्षा जास्त कमाई केली आहे. भारतात या चित्रपटाला प्रचंड प्रतिसाद मिळत असून परदेशातही चित्रपट चांगली कमाई करत आहे.

'रामायण'ची कमाई किती ?

रामायण हा चित्रपट ५ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित झाला. इंडस्ट्री ट्रॅकर सॅकनिल्कनुसार, चित्रपटाने प्रदर्शनाच्या सहाव्या दिवशी, मंगळवारी, भारतात ९४.१० कोटी रुपयांची निव्वळ कमाई केली आहे. यामुळे भारतातील चित्रपटाची एकूण कमाई ५२६.५० कोटी रुपयांवर पोहोचली आहे.

Ramayan Box Office Collection
Ramayana Box Office Collection: दिवाळीनंतर 'रामायण'ची जागतिक बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी; ५ दिवसांत किती कमावले?

परदेशात कमावले 'इतके' कोटी

भारतात या चित्रपटाने तुफान गल्ला जमवला असून परदेशातही चित्रपटाने चांगली कमाई केली आहे. या चित्रपटाने परदेशातून आतापर्यंत २९७ कोटी रुपये कमावले आहेत. यामुळे चित्रपटाची जगभरातील एकूण कमाई ८२३.५० कोटींवर पोहोचली आहे.

वीकेंडमुळे चित्रपटगृहे हाउसफुल्ल

"रामायण"चित्रपट प्रदर्शनाच्या सहा दिवसानंतरही कमाई करताना दिसत आहे. सोमवारी, या चित्रपटाने भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासातील सर्वाधिक कमाई करणारा ओपनिंग सोमवार नोंदवला. यानंतर, मंगळवारच्या सुट्टीचाही चित्रपटाला फायदा झाला. सण, वीकेंडच्या तिकिटांवरील सवलत आणि प्रेक्षकांच्या सकारात्मक प्रतिसादामुळे चित्रपटगृहे हाउसफुल्ल भरली होती.

मात्र, मंगळवारची कमाई सोमवारच्या तुलनेत अंदाजे १२.५ टक्क्यांनी कमी होती. चित्रपटाने सोमवारी १०७.५० कोटींची निव्वळ कमाई केली, तर मंगळवारी ही कमाई ९४.१० कोटी होती.

हिंदी चित्रपटाची सर्वाधिक कमाई

चित्रपटाने सहाव्या दिवशी कन्नडमध्ये ७.७५ कोटी, तेलगूमध्ये ४ कोटी, तमिळमध्ये ३.६० कोटी आणि मल्याळममध्ये २.७५ कोटी रुपये कमावले. तर या चित्रपटाने हिंदीमध्ये सर्वाधिक ७६ कोटी रुपयांची कमाई केली आहे.

Ramayan Box Office Collection
Pawan Kalyan Divorce: पवन कल्याण यांचा १३ वर्षांनंतर तिसरा घटस्फोट

उत्तर अमेरिकेत चित्रपटाची चांगली कामगिरी

"रामायण"ने भारतीय बाजारपेठेत चांगला गल्ला तर जमवला आहेच पण परदेशी बाजारपेठांमध्येही चांगली कामगिरी केली आहे . या चित्रपटाने उत्तर अमेरिकेत पहिल्या सोमवारी १.३७ दशलक्ष डॉलर्सची कमाई केली, ज्यामुळे उत्तर अमेरिकेतील कोणत्याही भारतीय चित्रपटासाठी पहिल्या सोमवारची ही सर्वाधिक कमाई ठरली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.