Nitish Bharadwaj On Ramayan : 'महाभारत'मधील श्रीकृष्णाची 'रामायण'वर टीका; नेमकं काय म्हणाले नितीश भारद्वाज?

Ramayan Movie Controversy : एकीकडे हा चित्रपट कमाईचे नवनवीन रेकॉर्ड करत असताना दुसरीकडे मात्र या चित्रपटावरून वाद निर्माण झाला आहे.
Nitish Bharadwaj On Ramayan
Nitish Bharadwaj On Ramayanfile photo
Published on: 
Updated on: 

Nitish Bharadwaj On Ramayan

पुढारी आॅनलाईन : ५ नोव्हेंबरला 'रामायण' हा बहुचर्चित चित्रपट प्रदर्शित झाला. रणबीर कपूर, साई पल्लवी आणि यश यांच्या या चित्रपटात प्रमुख भूमिका आहेत.एकीकडे हा चित्रपट कमाईचे नवनवीन रेकॉर्ड करत असताना दुसरीकडे मात्र या चित्रपटावरून वाद निर्माण झाला आहे. बी. आर. चोप्रा यांच्या लोकप्रिय टीव्ही मालिका 'महाभारत'मध्ये भगवान कृष्णाची भूमिका साकारलेल्या अभिनेते नितीश भारद्वाज यांनी या चित्रपटावर टीका केली आहे.

विशेष म्हणजे, आधी ट्रेलर पाहिल्यानंतर त्यांनी या चित्रपटाला ऑस्कर मिळेल असे भाकीतही केले होते. मात्र, चित्रपट पाहिल्यानंतर त्यांचे मत आता बदलले आहे. त्यांनी चित्रपटाच्या निर्मात्यांवर भारतीय इतिहास, वारसा आणि आध्यात्मिक मूल्यांचे चुकीचे चित्रण केल्याचा आरोप केला आहे.

Nitish Bharadwaj On Ramayan
Ramayan Box Office Collection : 'रामायण'ची बॉक्स ऑफिसवर घोडदौड सुरूच; सहा दिवसांत किती गल्ला जमवला ?

चित्रपटातील रावणाच्या चित्रणावर नाराजी

रामायण चित्रपटातील रावणाच्या चित्रणावर नितीश भारद्वाज यांनी नाराजी व्यक्त केली आहे. या चित्रपटात सुपरस्टार यशने रावणाची भूमिका साकारली आहे.

काय म्हणाले नितीश भारद्वाज ?

नितीश यांच्या मते, रामायण चित्रपटात रावणाला एक अत्यंत उदार, सामाजिकदृष्ट्या न्यायप्रिय आणि निष्पक्ष व्यक्ती म्हणून चित्रित केले आहे. त्यांच्या मते, असे केल्याने रामायणाच्या मूळ नैतिक आणि आध्यात्मिक संकल्पनांमध्ये बदल होतो.

त्यांनी सोशल मीडियावर लिहिले की, रामायण ही केवळ एक कथा नाही, तर शाश्वत भारताच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक जाणिवेत खोलवर रुजलेले एक महाकाव्य आहे. त्याचे नायक, नायिका आणि खलनायक हे सर्व त्याच्या संदेशाचा आणि मूल्यांचा अविभाज्य भाग आहेत.

त्यांनी पुढे असेही म्हटले की, धर्म, परंपरा आणि प्रतिष्ठा प्रस्थापित करण्यासाठी भगवान विष्णूंनी रामाचा अवतार घेतला. त्यामुळे, रावणाला अत्यंत उदार म्हणून चित्रित करणे हे रामायणाच्या मूळ उद्देशाला कमी लेखण्यासारखे आहे.

चित्रपटाच्या व्हिज्युअल इफेक्ट्सवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले

नितीश भारद्वाज यांनीही चित्रपटाच्या व्हिज्युअल इफेक्ट्सवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. यावेळी ते म्हणाले की , भव्य व्हिज्युअल इफेक्ट्स एखाद्या महाकाव्याची मूल्ये, तात्विक खोली आणि आध्यात्मिक सार यांची जागा घेऊ शकत नाहीत.

पुढे चित्रपटाविषयी बोलताना ते म्हणाले की, जेव्हा एखाद्या चित्रपटाची कथा भारताचा इतिहास, वारसा आणि आध्यात्मिक मूल्ये चुकीच्या पद्धतीने मांडते, तेव्हा त्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतीय सिनेमाचे प्रतिनिधित्व करू नये.

ट्रेलर पाहिल्यानंतर काय म्हणाले होते नितीश भारद्वाज ?

नितीश भारद्वाज यांनी ट्रेलर पाहिल्यानंतर चित्रपटाची खूप प्रशंसा केली होती. त्यांनी सोशल मीडियावर लिहिले होते की, हा चित्रपट 'सर्वोत्कृष्ट परदेशी चित्रपट' श्रेणीत १००% ऑस्कर जिंकू शकतो.पण आता चित्रपट पाहिल्यानंतर त्यांनी चित्रपटावर टीका केली आहे.

Nitish Bharadwaj On Ramayan
Ranveer Singh Grandfather Death : बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंहच्या आजोबांचे निधन; वयाच्या ९६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

नितेश तिवारी दिग्दर्शित 'रामायण'

रणबीर कपूर अभिनीत 'रामायण' हा चित्रपट नितेश तिवारी यांनी दिग्दर्शित केला आहे. या चित्रपटाची निर्मिती नमित मल्होत्रा ​​यांनी केली आहे. रणबीर कपूरने प्रभू राम, साई पल्लवीने सीता, यशने रावण यांची भूमिका साकारली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.