Bade Sahab Dhurandhar 2 | ८ तासांचा मेकअ‍ॅप अन् रिकाम्या पोटी शूटिंग! डॅनिश इकबालने ‘बडे साब’साठी घेतलेली मेहनत पाहून थक्क व्हाल

'Bade Sahab' Dhurandhar 2 Danish Iqbal | डॅनिश इकबालला 'बडे साब'ची भूमिका कशी मिळाली? अंथरूणावर खिळलेला डॉन साकारणं किती आव्हानात्मक होतं?
danish iqbal
danish iqbal role Bade Sahab in Dhurandhar 2 pudhari photo
Published on
Updated on

danish iqbal Bade Saab character inspired by Dawood Ibrahim Dhurandhar: The Revenge

आदित्य धर दिग्दर्शित 'धुरंधर २: द रिव्हेंज' (Dhurandhar 2: The Revenge) हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर तुफान धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटातील सर्वात मोठे रहस्य म्हणजे चित्रपटाचा मुख्य व्हिलन 'बडे साब' कोण आहे? पहिल्या भागापासून सुरू असलेल्या या रहस्याचा उलगडा आता झाला असून ही भूमिका अभिनेता डॅनिश इकबाल (Danish Iqbal) यांनी साकारली आहे. दाऊद इब्राहिमच्या जीवनावर आधारित 'बडे साब'ची ही भूमिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरत आहे.

एक डॉन जो अंथरुणावर खिळलेला आहे. बोलताना तो अडखळतोय. आजारापणातही तो इतका शक्तीशाली आहे हे प्रेक्षकांना एका तरुण अभिनेत्याने दाखवणं किती कठीण होतं, हे अभिनेता डॅनिशने सांगितलं. एका मुलाखतीत डॅनिशने सांगितलं की, त्याला ही भूमिका कशी मिळाली. डॉन दाऊद साकारणं किती कठीण होतं. आवाज बदलण्यापासून मेकअपपर्यंत खूप मेहनत घेतल्याचे डॅनिशने सांगितलं.

डॅनिश इकबाल यांना होती धाकधूक

डॅनिश यांनी एका मुलाखतीत सांगितलं की, लोकांना जर माझा अभिनय आवडला नाही तर इंडस्ट्रीतून लवकरच पॅकअप करावं लागणार हे माहिती होतं. मला अपेक्षा होती की, उत्तमच चित्रपट बनणार. मी चित्रपट दुसऱ्या दिवशी पाहिला. मन धडकत होतं जेव्हा सोशल मीडयावर चर्चा होऊ लागली होती. जेव्हा मी चित्रपट प्रेक्षकांसोबत पाहिला तेव्हा चांगला प्रतिसाद मिळाला.

डॅनिश तरूण असल्यापासून थिएटर करत आले आहेत. १९९४ मध्ये त्यांनी पहिलं नाटक केलं होतं. दंगा असे नाटकाचे नाव होते. तिथून आजपर्यंत ३० वर्षे थिएटरची आणि २००३ पासून आजतागायत बॉलिवूड इंडस्ट्रीत काम केलं. A Mighty Heart, Maharani Season 2, Sankalp, Sadho अशा चित्रपटात त्यांनी काम केलं आहे. त्यांनी इंग्लंडमधून अभिनयाचे धडे घेतले आहे. त्याआधी एनएसडीमध्ये अभिनयाचे प्रशिक्षण घेतले. अरण्यक, हक यासारख्या चित्रपटातही त्यांचा उत्कृष्ट अभिनय आहे.

danish iqbal
Dhurandhar 2 is propaganda? 'सिनेमा प्रपोगंडावर राजकारण करणाऱ्यांनो..' धुरंधर-२च्या 'रिझवान'ने ट्रोलर्सची बोलती केली बंद!

एक डॉन अंथरुणाला खिळलेला वृद्ध, तो बोलताना अडखळताना अडखळतो... यासाठी विशेष तयारी डॅनिश यांनी केली. ते या पात्राबद्दल म्हणतो- एका आजारी डॉन बडे साबचे पात्र साकारायचं आहे मला हे कळलं तेव्हा मी वृद्धांना पाहायला लागलो, त्यांना भेटलो, ते कसे बोलतात, कसे चालतात, आजारी वृद्ध कसे राहतात हे निरीक्षण केलं. आजारापणातही तो इतका शक्तीशाली दाखवणं, ते स्वीकारणं इतकं आव्हानात्मक होतं की, ते पात्र लवकर स्वीकारण्यासाठी खूप कष्ट करावे लागले.

उपाशी पोटी मेकअपमध्ये तासनतास शूटिंग

डॅनिश म्हणाले- मेकअपसाठी सात-आठ तास लागायचे. जसजसा मेकअप पूर्ण होत जायचा, तेव्हा ते पात्र आपोआप सादर करता यायचं. कुठलेही अन्न खाता येत नव्हते. फक्त लिक्विड पिण्यासाठी दिलं जायचं. डॅनिश यांनी रणवीर सिंह, अर्जुन रामपाल यांच्यासोबत काम करून खूप चांगलं वाटल्याचं नमूद केलं. ते खूप मृदू आहेत. आपण खूप मोठे स्टार आहोत, असे त्यांनी कधीच भासवू दिलं नाही. कामापेक्षा अधिक प्रेम सेटवर मिळाल्याचे ते म्हणाले.

danish iqbal
Dhurandhar 2 | रणवीर सिंगने पगडी घालून ओढली सिगारेट? 'धुरंधर २'च्या व्हायरल फोटोवर दिग्दर्शक आदित्य धर भडकला!

हा चित्रपट कसा मिळाला?

डॅनिश यांनी हा चित्रपट कसा मिळाला, याबद्दल सांगितले. ते म्हणाले, मुकेश यांच्या ऑफिसवरून फोन आला. त्यांनी माझी ऊंची, वजन आणि वय विचारलं. दुसऱ्या दिवशी फोन आला की, या तारखांना तुम्ही फ्री आहात का? डॅनिश यांनी हो उत्तर दिलं. थोड्याच वेळात मुकेश यांचा थेट फोन आळा आणि ते म्हणाले की, धुरंधर २ मध्ये बडे साबची भूमिका करायची आहे. ही स्ट्राँग भूमिका मला मिळाली.

घरच्यांपासूनही लपवले गुपित

या भूमिकेसाठी डॅनिशने कमालीची गुप्तता पाळली होती. चित्रपट प्रदर्शित होईपर्यंत त्यांनी स्वतःच्या पत्नी आणि कुटुंबालाही आपण कोणती भूमिका करत आहोत हे सांगितले नव्हते. आज डॅनिश यांच्या या कष्टाचे फळ त्यांना मिळत असून त्यांच्या 'बडे साब' या भूमिकेचे सिनेजगतात प्रचंड कौतुक होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news