Rajkumar Santoshi : दिग्दर्शक राजकुमार संतोषी यांची ९ वर्षांनंतर वापसी, नव्या चित्रपटावरून वाद?

Rajkumar Santoshi
Rajkumar Santoshi

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलीवूडचे सर्वात यशस्वी दिग्दर्शक तब्बल ९ वर्षांनंतर आपल्या त्याच खास अंदाजात वापसी करत आहेत. घायल, घातक, दामिनी 'अंदाज अपना अपना', 'खाकी', 'चायना गेट', 'अजब प्रेम की गजब कहानी' आणि 'द लीजेंड ऑफ भगत सिंह' यासारखे चित्रपट आणणारे राजकुमार संतोषी (Rajkumar Santoshi) एका नव्या चित्रपटाचे दिग्दर्शन करण्यास सज्ज झाले आहेत. (Rajkumar Santoshi )

राजकुमार संतोषी ज्या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत, त्या चित्रपटाचे नाव 'गांधी गोडसे एक युद्ध' असं असल्याचे समोर आले आहेत. 'गांधी गोडसे एक युद्ध' मध्ये महात्मा गांधी आणि नाथूराम गोडसे यांच्या दोन विरोधी विचारधारांमधील संघर्ष दाखवण्यात आला आहे. चित्रपट निर्मात्यांनी या विषयावर चित्रपट आणण्याची घोषणा केली. या चित्रपटामध्ये संगीत ए आर रहमान यांचं असेल. संतोषी प्रोडक्शन्स, मनीला संतोषी द्वारा निर्मित हा चित्रपट २६ जानेवारी , २०२३ रोजी प्रजासत्ताक दिनी थिएटरमध्ये रिलीज होईल.

सलग दोन चित्रपटांना मिळाला सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाचा फिल्मफेअर पुरस्कार

राजकुमार संतोषी एक उत्तम दिग्दर्शक, निर्माते आणि लेखकदेखील आहेत. त्यांनी सनी देओलला घेऊन 'घायल' यासारखे चित्रपट केले. या चित्रपटासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाचा फिल्मफेअर पुरस्कारदेखील मिळाला आहे. यानंतर 'दामिनी' चित्रपटासाठी त्यांना त्यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाचा फिल्मफेअर पुरस्कारदेखील मिळाला.

पुढे राजकुमार संतोषी यांनी 'अंदाज अपना अपना', 'चायना गेट', 'पुकार', 'लीजेंड ऑफ भगत सिंह' आणि अजब प्रेम की गजब कहानी यासारखे चित्रपट आणले. त्यांचा शेवटचा चित्रपट शाहिद कपूर आणि इलियाना डिक्रूज स्टारर 'फटा पोस्टर निकला हीरो' होता.

 

View this post on Instagram

 

A post shared by Deolomania (@deolomania_rus)

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news