Rajkumar Rao : राजकुमार राव घेऊन येतोय “श्रीकांत”, ‘या’ उद्योगपतीवर असणार चित्रपट

राजकुमार राव
राजकुमार राव

पुढारी ऑनलाईन डेस्क : पॉवरपॅक परफॉर्मर राजकुमार रावने त्याच्या सोशल मीडिया हँडल्सवर त्याच्या आगामी चित्रपटाचे नवीन शीर्षक आणि रिलीज तारखेची घोषणा केली. पूर्वी चित्रपटाचे नाव 'श्री' होते आणि आता ते " श्रीकांत" असे झाले आहे. राजकुमारने (Rajkumar Rao ) सोशल मीडिया वरून ही माहिती दिली. १० मे, २०२४ ला "अक्षय तृतीयेच्या शुभ दिवशी" हा चित्रपट रिलीज होणार आहे. (Rajkumar Rao )

'श्रीकांत' हा चित्रपट उद्योगपती श्रीकांत भोल्लाच्या प्रेरणादायी प्रवासाभोवती असलेली गोष्ट आहे. ज्याने आपली दृष्टी कमजोर होऊ दिली नाही आणि अखेरीस बोलंट इंडस्ट्रीजची स्थापना केली. "एक उल्लेखनीय सत्य कथा जी तुमचे डोळे उघडेल," राजकुमार राव यांनी त्यांच्या सोशल मीडिया पोस्टला कॅप्शन दिले.

तुषार हिरानंदानी दिग्दर्शित आणि भूषण कुमार, कृष्ण कुमार आणि निधी परमार हिरानंदानी निर्मित या आगामी बायोपिकमध्ये ज्योतिका, आलिया एफ आणि शरद केळकर यांच्यासोबत पॉवरपॅक परफॉर्मर स्क्रीन शेअर करणार आहे.. 'श्रीकांत' व्यतिरिक्त, राव. 'स्त्री २' मध्येही दिसणार आहे. त्याच्याकडे 'मिस्टर अँड मिसेस माही', 'गन्स अँड गुलाब सीझन २' आणि 'विकी विद्या का वो वाला व्हिडिओ' देखील आहेत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news