3 Idiots 2 : आमिर खानने दिलं सरप्राइज; पुन्हा परतणार रॅंचो, राजू आणि फरहानची जादू

‘3 Idiots 2’ ची कथा 10 वर्षांनी पुढे सरकणार
3 Idiots 2 Movie
3 Idiots 2 : आमिर खानने दिल सरप्राइज; पुन्हा परतणार रॅंचो, राजू आणि फरहानची जादू file photo
Published on
Updated on

aamir khan confirms 3 idiots 2 magic of rancho raju farhan will return story will jump 10 years ahead

मुंबई : पुढारी ऑनलाईन

‘3 इडियट्स 2’बाबत बऱ्याच दिवसांपासून चर्चा सुरू होत्या, पण आता स्वतः आमिर खानने या चित्रपटाबद्दल महत्त्वाची अपडेट दिली आहे. त्‍याने कथानकाबद्दलही सूचक माहिती दिली आहे.

बॉलीवूडमधील अत्यंत प्रतिष्ठित चित्रपटांपैकी एक असलेल्या ‘3 इडियट्स’च्या सिक्वेलची चाहत्यांना अनेक वर्षांपासून प्रतीक्षा होती. आता या चर्चांना अधिकृत दुजोरा मिळाला आहे. आमिर खानने पुष्टी केली आहे की, चित्रपटाचा दुसरा भाग तयार होत असून, दिग्दर्शक राजकुमार हिरानी पुन्हा एकदा या प्रोजेक्टचे दिग्दर्शन करणार आहेत. ही बातमी चाहत्यांसाठी आनंदाची ठरली आहे. आमिर यांच्या मते, सध्या चित्रपटाच्या पटकथेवर काम सुरू आहे आणि ही कथा अतिशय “सुंदर” असणार आहे.

3 Idiots 2 Movie
Marathi Movie Release | ललित प्रभाकरचा नवा लूक की पूजा-प्रार्थनाचे सौंदर्य? प्रेक्षक कोणाला पसंती देणार?

कथा 10 वर्षांनी पुढे

या सिक्वेलमधील सर्वात खास बाब म्हणजे त्याची टाइमलाइन. पहिल्या भागानंतर सुमारे 10 वर्षांनी कथा पुढे सरकणार आहे. यात आमिर खान (रॅंचो/फुन्सुख वांगडू), आर. माधवन (फरहान) आणि शर्मन जोशी (राजू रस्तोगी) ही तिकडी पुन्हा एकत्र दिसणार आहे. तसेच करीना कपूर खान देखील या चित्रपटात झळकणार आहे.

या चित्रपटाची निर्मिती विधू विनोद चोप्राकरणार आहेत. एका मुलाखतीत आमिर यांनी सांगितले की अभिजात जोशी आणि राजकुमार हिरानी यांनी ही कथा अतिशय वेगळ्या आणि विनोदी पद्धतीने तयार केली आहे, जी मूळ चित्रपटाची आत्मा जपून नवीन काहीतरी देईल.

फुन्सुख वांगडूच्या पुनरागमनाबाबत उत्सुकता

आमिर खान यांनी ‘फुन्सुख वांगडू’ ही व्यक्तिरेखा पुन्हा साकारण्याबाबत उत्साह व्यक्त केला. त्यांनी सांगितले, “राजू सध्या ‘3 इडियट्स 2’वर काम करत आहेत. मी कथा ऐकली आहे आणि ती खरोखरच अप्रतिम आहे. अजून थोडे काम बाकी आहे, पण मूळ कल्पना खूपच वेगळी आणि प्रभावी आहे.”

3 Idiots 2 Movie
Salman Khan: मोठी बातमी! सलमान खानच्या नवीन चित्रपटाचे दिग्दर्शन करणार वामशी पैडिपल्ली; भाईजानचा साऊथमध्ये डंका!

2022 मध्ये ‘लाल सिंग चड्ढा’ अपेक्षित यश न मिळाल्यानंतर, आमिर यांनी अलीकडे ‘सीतारे जमीन पर’द्वारे पुनरागमन केले आहे. अशा परिस्थितीत ‘3 इडियट्स’सारख्या मोठ्या ब्रँडशी पुन्हा जोडले जाणे चाहत्यांसाठी खूपच रोमांचक ठरणार आहे.

राजकुमार हिरानी यांच्या दिग्दर्शनाखाली 2009 मध्ये आलेला ‘3 इडियट्स’ हा केवळ चित्रपट नव्हता, तर एक सांस्कृतिक क्रांती ठरला होता. चेतन भगत यांच्या ‘Five Point Someone’ या कादंबरीवर आधारित हा चित्रपट भारतीय शिक्षणपद्धती आणि विद्यार्थ्यांवरील ताण यावर भाष्य करणारा होता.

या चित्रपटात बोमन इराणी यांनी ‘व्हायरस’ (प्राचार्य) आणि ओमी वैद्य यांनी ‘चतुर’ या लक्षवेधी भूमिका साकारल्या होत्या. ‘3 इडियट्स’ हा जगभरात ₹400 कोटींची कमाई करणारा पहिला भारतीय चित्रपट ठरला होता. यासह, या चित्रपटाने तीन राष्ट्रीय पुरस्कारही जिंकले होते.

आजही हा चित्रपट टीव्ही आणि ओटीटीवर लोकप्रिय आहे. आता पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे की ‘3 इडियट्स 2’ही त्याच यशाची पुनरावृत्ती करू शकेल का.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news