

Movie Raja Shivaji Box Office collection day 19th
रितेश देशमुख दिग्दर्शित 'राजा शिवाजी' हा चित्रपट आता नवा विक्रम सेट करण्याच्या मार्गावर आहे. लवकरच या चित्रपटाला तीन आठवडे पूर्ण होतील. त्यामुळे सर्वांच्या नजरा या चित्रपटाच्या नव्या विक्रमाकडे लागून राहिले आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर आधारित असलेल्या या चित्रपटाला प्रचंड यश मिळत असताना भारतातूनच नाही तर जगभरात देखील चांगली कमाई करत आहे.
बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने आधीच जगभरात १०० कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. आता तो एक नवा विक्रम प्रस्थापित करण्याच्या उंबरठ्यावर आहे.
जिओ स्टुडिओज आणि मुंबई फिल्म कंपनी निर्मित 'राजा शिवाजी' या चित्रपटाने देशांतर्गत आणि परदेशातही बॉक्स ऑफिसवर आपली पकड कायम ठेवली असून, भारतात ९३.०० कोटी रुपयांची निव्वळ आणि जगभरात ११४.८० कोटी रुपयांची एकूण कमाई केलीय. त्यामुळे आतापर्यंतचा सर्वाधिक कमाई करणारा मराठी चित्रपट ठरला आहे.
ऐतिहासिक ओपनिंगसह विक्रमांची नोंद केल्यानंतर आणि पहिल्या दोन आठवड्यांत कमाईच्या बाबतीत चित्रपटाने सातत्य राखले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना वाहिलेल्या या महाकाव्याला तिसऱ्या वीकेंडला पुन्हा एकदा प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. मराठी आणि हिंदी दोन्ही भाषेत या चित्रपटाला प्रचंड प्रसिद्धी आणि लोकप्रियता मिळाली आहे.
बॉक्स ऑफिस ब्रेक-अप (भारतातील निव्वळ कमाई)
पहिला आठवडा: ५७.७० कोटी रुपये
दुसरा आठवडा: २७.०० कोटी
तिसरा आठवडा:
१५ वा दिवस (शुक्रवार): १.७० कोटी
१६ वा दिवस (शनिवार): २.९० कोटी
१७ वा दिवस (रविवार): ३.८० कोटी
भारतातील एकूण कमाई: ९३.१० कोटी निव्वळ
भारतातील एकूण कमाई: १०९.९० कोटी
परदेशातील एकूण कमाई: ४.१० कोटी
जगभरातील एकूण कमाई: ११४.८० कोटी
तिसऱ्या आठवड्यातील दमदार कामगिरीमुळे बॉक्स ऑफिसवरील आपला प्रवास अधिक मजबूत झाल्याने, 'राजा शिवाजी' हा चित्रपट मराठी चित्रपटसृष्टीतील एक महत्त्वपूर्ण ब्लॉकबस्टर यशस्वी चित्रपट म्हणून उदयास येत आहे.
दरम्यान, रितेश देशमुख अभिनीत या चित्रपटाने १९ व्या दिवशी परदेशात ०.१० कोटी रुपयांची कमाई केली, ज्यामुळे त्याची परदेशातील एकूण कमाई ४.१० कोटी रुपयांवर पोहोचली आहे.