Raj Kundra Shilpa Relationship: शिल्पा घटस्फोट देणार... जेलमध्ये असलेल्या राज कुंद्रांनी दुसऱ्या दिवशीच फोन लावला होता अन्...

Raj Kundra Shilpa Relationship
Raj Kundra Shilpa Relationshippudhari
Published on
Updated on

Raj Kundra Shilpa Relationship: शिल्पा शेट्टी यांचे पती आणि व्यावसायिक राज कुंद्रा यांना २०२१ मध्ये पॉर्नोग्राफी प्रकरणात अटक झाली होती. त्यावेळी त्यांच्या व्यावसायिक आणि वैयक्तिक आयुष्याचे खूप मोठे नुकासन झाले होते. अजूनही याबाबत त्यांच्यामागे चौकशीचा ससेमिरा सुरू आहे. ज्यावेळी त्यांना अटक झाली होती त्यावेळी शिल्पा शेट्टी आणि त्यांच्या नात्याबाबत देखील बरंच काही लिहिलं जात होतं.

Raj Kundra Shilpa Relationship
Raj Kundra : परदेश वारीसाठी 60 कोटी रुपये जमा करा, अन्यथा बँक गॅरंटी द्या!

ट्विटवरून अटकेची माहिती

राज यांनी नुकतेच एका न्यूज चॅनलला मुलाखत दिली. त्यावेळी त्यांनी त्यांच्या अटकेबाबत आणि शिल्पासोबतच्या रिलेशनशिपबाबत देखील वक्तव्य केलं. ते म्हणाले की, 'मला चौकशीसाठी पोलीस स्टेशनमध्ये बोलवण्यात आलं. मी पोलीस ठाण्यात गेल्यानंतर मी ट्विटरवर पाहिलं की मला अटक झाल्याचं वृत्त आलं आहे. मी पोलीस अधिकाऱ्यांना विचारलं त्यावेळी त्यांनी तशीच ऑर्डर असल्याचं सांगितलं.'

Raj Kundra Shilpa Relationship
Raj Kundra Shilpa Shetty fraud case : राज कुंद्रा-शिल्पाला दिलासा नाहीच

शिल्पालाही बातमीतूनच कळालं

ते पुढे म्हणाले, 'शिल्पा शेट्टीला देखील माझ्या अटकेची बातमी न्यूजमधूनच समजली. त्यावेळी माझा व्यवसाय हा भारतात सुरू होता. त्यात जवळपास ४००० लोकं काम करत होती. शिल्पा म्हणाली तू नसताना मी हे सर्व कसं मॅनेज करू, मला सांगण्यात आलं की मला ६३ दिवस जेलमध्ये रहावं लागेल. मात्र अजून किती दिवस लागतील मला माहिती नव्हतं.

राज म्हणाले की, मला वाटतं की शिल्पाने बिजनेस बंद करण्याचा निर्णय घेतला होता. माझे देखील डोकं चालत नव्हतं मी एक दिवस आयपीएलचा मालक होता आणि दुसऱ्याच दिवशी मी जेलमध्ये होतो. ज्यावेळी मी बाहेर आलो त्यावेळी मी खूप खूष होतो. मी नवीन सुरूवात केली.'

Raj Kundra Shilpa Relationship
Shilpa Shetty Beach Club | शिल्पा शेट्टीच्या ‘बॅस्टियन रिव्हिएरा’ बीच क्लबवर कारवाईचा फास; जीसीझेडएमएची नोटीस

घटस्फोटाची बातमी अन् ...

राज यांनी सांगितलं की ज्यावेळी मी जेलमध्ये होतो त्यावेळी माझ्या घटस्फोटाच्या वृत्ताने माझ्या पायाखालची वाळू सरकली होती. मी जेलमध्ये कसंतरी मॅनेज करत होतो. मात्र एके दिवशी माध्यमातून बातमी आली की शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांचा घटस्फोट होणार आहे.'

'घटस्फोटाच्या बातमीने मी खूप अस्वस्थ झालो. मी झोपू शकलो नाही. मला वाटलं की मी आता मरणार. माझ्या आयुष्याला आता काही अर्थ नाही. माझ्यासाठी माझी पत्नी आणि कुटुंब याच्याव्यतिरिक्त दुसरं काही महत्वाचं नव्हतं.

Raj Kundra Shilpa Relationship
Shilpa Shetty: शिल्पा शेट्टीने केली तिचे रेस्टॉरंट बंद करण्याची घोषणा; पती राज कुंद्राच्या या कारणांमुळे करावे लागले बंद? जाणून घ्या

शिल्पाला फोन केला अन्...

राज कुंद्रा यांनी सांगितलं की, पुढच्या दिवशी मी शिल्पा शेट्टीला फोन केला. त्यावेळी तिने हे सगळं खोटं आहे. मी तुझ्या सोबतच आहे. माझा तुझ्यावर विश्वास आहे असं सांगितलं. या कॉलनंतर मला खूप ताकद मिळाली. मी म्हणालो की आता काय करायचंय ते करा माझी पत्नी माझ्यासोबत आहे आता मला काही फरक पडत नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news