

पुढारी ऑनलाईन डेस्क : सध्या आघाडीवर असलेला अभिनेता म्हणजे आर. माधवन. भारतातील सर्वात सुप्रसिद्ध अभिनेत्या पैकी आर माधवन मानला जातो. या अभिनेत्याने अलीकडेच त्याच्या सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट केला आहे, ज्यामध्ये तो एका साधा शर्ट आणि ट्राउझर्समध्ये दिसतोय आणि यात तो एकदम फिट दिसतोय.
माधवनने फोटो शेअर करत कॅप्शन दिले आहे. " Half way there look lot's to do long way to go Head down and focus ❤️❤️???"
सहजतेने भूमिका साकारून नेहमीच त्याने प्रेक्षकांची मनेजिंकली आहे. अष्टपैलू व्यक्तिमत्त्व आणि अभिनयाची अनोखी छाप त्याने आपल्या विविध भूमिका मधून दिली आहे. रोमँटिक ते कॉमेडी आणि बहुभाषिक चित्रपटांमधील विविध पात्रांच्या कुशल अभिनयाने नेहमीच तो प्रेक्षकांची मन जिंकतो. रॉकेट्री: द नंबी इफेक्ट या त्याच्या दिग्दर्शनाच्या पहिल्याच चित्रपटाच्या यशाने अभिनेता सध्या चर्चेत आहे. अभिनेत्याला नुकताच या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा आयफा पुरस्कारही मिळाला आहे.