

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलीवूडचा रायझिंग स्टार सुशांत सिंह राजपूतने १४ जून, २०२० रोजी जगाला अलविदा म्हटले. (Rhea Chakraborty) आज सुशांतची तिसरा स्मृतीदिवस आहे. दरम्यान, त्याची तथाकथित गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीने सुशांत सिंह सोबतचा एक रोमँटिक व्हिडिओ शेअर केला आहे. (Rhea Chakraborty)
बॉलीवूड दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतचे निधन होऊन आज तीन वर्षे पूर्ण झाले. सुशांतच्या निधनानंतर तिच्या परिवारवाल्यांनी रिया चक्रवर्तीवर गंभीर आरोप केले. सुशांतच्या डेथ ॲनिव्हर्सरीवर रियाने एक व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ समोर येताच सुशांतचे फॅन्स भडकले. युजर्सनी कमेंट्स करत रियाला ट्रोल करत आहेत.
सुशांत सिंह राजपूतच्या तिसऱ्या स्मृतीदिनानिमित्त त्याची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीने एक व्हिडिओ शेअर केला आहे.या व्हिडिओमध्ये रिया आणि सुशांत दिसत आहेत. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, रिया – सुशांत एका मोठ्या दगडावर बसले आहेत. दरम्यान रियाने सुशांतच्या खूप जवळ दिसत आहे. व्हिडिओमध्ये सुशांतची स्माईल दिसत आहे. या व्हिडिओमध्ये रियाने लाल रंगाचा हार्ट बनवला आहे.
रिया चक्रवर्तीचा हा व्हिडिओ समोर आल्यानंतर सोशल मीडियावर नेटकरी भडकले. तिला कमेंट्सच्या माध्यमातून तिला खरे-खोटे सुनावले. व्हिडिओवर कमेंट करत एका युजरने लिहिलं, 'का ढोंग करतेस तू.' एका युजरने लिहिलं, 'इतका घाणेरडा प्रकार केल्यानंतर अशी पोस्ट करते, जसे की पीडित हिच आहे.' एकाने लिहिलं, 'पोज तर अशी देत आहे की, जणू आयपष्भर साथ देणार होती.'