Punha Kartavya Aahe tv serial
वसुंधरा-बनीमध्ये दुरावा निर्माण होणार का?Instagram

Punha Kartavya Aahe : वसुंधरा-बनीमध्ये दुरावा?

वसुंधरा-बनीमध्ये दुरावा?
Published on

पुढारी ऑनलाईन डेस्क : 'पुन्हा कर्तव्य आहे' मालिकेत बनीच बोर्डिंग स्कूलमध्ये ॲडमिशन होतं आणि परतीच्या प्रवासाला निघालेल्या वसुंधराचा होस्टेलमधून पाय निघत नाही. बनीच्या मनाची देखील घालमेल होतेय, तो वसुंधरा समोर रडू शकत नाहीये. मात्र वसुंधरा तिथून गेल्यानंतर बनी ढसाढसा रडायला लागतो. तर इथे जयश्री पाय दुखण्याचे खोटं खोटं नाटक करतेय. वॉर्डन बनीची सगळ्यांसोबत ओळख करून देते आणि पूर्ण दिवसाचे रुटीन समजावते. हॉस्टेलमध्ये दोन विद्यार्थी मोहित आणि प्रणित बनीला घाबरवण्याचा प्रयत्न करतात आणि हे सगळं बनीसाठी नवीन असल्यामुळे बनीला वसुंधराची खूप आठवण येते. वसुंधरा भुकेली असल्याकारणाने आकाश तिला बाहेर जेवायला घेऊन जातो. तिकडे आकाशची भेट लकीशी होते. आकाशने बिझनेस एक्सपांड करावा म्हणून सगळंकाही गहाण ठेवून लोन घेतलंय.

Punha Kartavya Aahe tv serial
Sobhita Dhulipala | कॉल गर्ल, वेडिंग प्लॅनरचे रोल, ते नागा चैतन्यची वधू; शोभिताचा प्रवास

भास्कर ह्या विचाराच्या विरोधात आहे आणि घरामध्ये पहिल्यांदा भास्कर आणि आकाश मध्ये भांडण होतं. वसु आणि अवनी भावांच्या भांडणात पडायचं नाही, असं ठरवतात. इथे बनीने केलेला फोन वसुंधरा उचलते. मात्र तिला बनीसोबत बोलता येत नाही. त्यामुळे बनीचा गैरसमज होतो की, वसुंधरा त्याच्याशिवाय ठाकुरांच्या घरी खुश आहे. बनी आणि वसुंधराच्या नात्यात खरंच दुरावा निर्माण होईल? लकी आणि वसुंधरा एकमेकांच्या समोर येतील? यासाठी 'पुन्हा कर्तव्य आहे' सोमवार ते शुक्रवार रात्री ९:३० वाजता झी मराठीवर पाहता येईल.

Punha Kartavya Aahe tv serial
'फुलवंती'..प्राजक्ता माळीच्या 'त्या' पोस्टची चर्चा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news