Sobhita Dhulipala - Naga Chaitanya Engagement
नागा चैतन्य आणि शोभिता धुलिपाला यांचा साखरपुडा गुरुवारी सकाळी झाला.

Sobhita Dhulipala | कॉल गर्ल, वेडिंग प्लॅनरचे रोल, ते नागा चैतन्यची वधू; शोभिताचा प्रवास

Sobhita Dhulipala - Naga Chaitanya | दोन वर्षं एकमेकांना डेट केल्यानंतर नागा चैतन्य आणि शोभिता यांचा साखरपुडा गुरुवारी झाला
Published on

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेत्री शोभिता धुलिपाला आणि दक्षिणेतील सुपरस्टार नागा चैतन्य यांचा आज साखरपुडा झाला. नागा चैतन्यचे वडील लोकप्रिय अभिनेते नागार्जून यांनी सोशल मीडियावर दोघांचे फोटो शेअर करत ही बातमी दिलली आहे. नागा चैतन्यचा काही वर्षांपूर्वी अभिनेत्री सामंथा रूथ प्रभूशी घटस्फोट घेतला होता. त्यानंतर नागा हा शोभिताला डेट करत होता. तेव्हापासून शोभिता आणि नागा लग्न करणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या. (Sobhita Dhulipala - Naga Chaitanya)

कोण आहे शोभिता? | Who is Shobhita?

शोभिताने बॉलिवडू आणि OTTवर मोजक्या पण अतिशय दमदार भूमिका केल्या आहेत. पण शोभिताचा प्रवास अभिनेत्री म्हणून नव्हे तर मॉडेल म्हणून सुरू झाला. शोभिताचा जन्म ३१ मे १९९२ला आंध्र प्रदेशातील तेनाली या शहरात झाला. शोभिता २०१३मध्ये झालेल्या फेमिना मिस इंडियाच्या अंतिम फेरीत पोहोचली होती. शोभिता या वेळी पहिल्यांदा चर्चेत आली.

शोभिताचे बॉलिवडूमध्ये पदापर्ण

शोभिताचा पहिला सिनेमा म्हणजे रामन राघवन २.०. या चित्रपटाचे दिग्दर्शन अनुराग कश्यपने केले होते. यात शोभिताने स्मृतिका नायडू ही भूमिका केली होती. त्याचा अभिनयाचे फार चांगले कौतुक सिनेसृष्टीत झाले. पण या चित्रपटानंतर शोभिताने धडाधड चित्रपट न स्वीकारता निवड भूमिका करण्यावर भर दिला.

शोभिताचा OTTवर दमदार अभिनय | Shobhita OTT roles

Sobhita Dhulipala - Naga Chaitanya Engagement
प्राईम व्हिडिओवरील सिरिज Made In Heaven मुळे शोभिता चर्चेत आली.Instagram

शोभिता खऱ्या अर्थाने चर्चेत आली ती प्राईम व्हिडिओवरील सिरिज Made In Heaven मुळे. या सिरिजमध्ये शोभिताने तारा खन्ना या वेडिंग प्लॅनरची भूमिका केली आहे. ही सिरिज प्रचंड गाजली. तारा खन्ना या महत्त्वाकांशी वेडिंग प्लॅनरची भूमिका शोभिताने फार ताकदीने पेलेली होती.

Made in Heaven नंतर शोभिताला मागे वळून पाहावे लागले नाही. Bard of Blood, the Night Manager, Kurup आणि पोन्नियिने सेल्वन या चित्रपटातील भूमिकांमुळे शोभिताची अष्टपैलू अभिनेत्री म्हणून ओळख अधिक ठळक झाली.

शोभिताचा हॉलिवूडमध्ये प्रवेश

शोभिताने बॉलिवडू आणि OTTच्या जोडीने हॉलिवूडमध्येही काम केले आहे. देव पटेल यांनी दिग्दर्शन केलल्या Monkey Man या सिनेमात कॉल गर्लची भूमिका केली आहे. यात सिनेमातील हाणामाऱ्यांच्या सीनमध्ये शोभिताने छाप सोडली.

नागा चैतन्यसोबत डेटिंग | Naga Chaitanya

Sobhita Dhulipala - Naga Chaitanya Engagement
शोभिता आणि नागा गेली दोन वर्षं एकमेकांना डेट करत आहेत.Instagram

नागा चैतन्या हा तेलुगु सिनेमातील नामवंत अभिनेता आहे. २०२२पासून ते एकमेकांना डेट करत आहेत. दोघांनी याबाबत कधी स्पष्ट खुलासा केलेला नव्हता, पण मीडियात याची नेहमी चर्च होत राहिली.

Sobhita Dhulipala - Naga Chaitanya Engagement
'शोभिता धूलिपाला' आहे तरी कोण? पाहा तिची एक झलक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news