Priyanka Chopra : प्रियांका चोप्राच्या ‘वुमन ऑफ माय बिलियन’ची तारीख समोर

Priyanka Chopra
Priyanka Chopra
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : "वुमन ऑफ माय बिलियन" या अजितेश शर्मा दिग्दर्शित आणि सृष्टी बक्षीची सत्यकथा असलेली डॉक्युमेंटरी येत्या मे मध्ये अमेझॉन प्राईमवर रिलीज होणार आहे. (Priyanka Chopra) स्त्रिया, त्यांचे संघर्ष, स्वप्ने, हक्क याविषयी ही कथा असून हा विषय नक्कीच वेगळा असणार आहे. प्रियांका चोप्रा जोनासने तिच्या बॅनर असलेल्या पर्पल पेबल पिक्चर्सद्वारे अपूर्व बक्षीच्या अवेडेशियस ओरिजिनल्सच्या सहकार्याने याची निर्मिती केली आहे. (Priyanka Chopra)

ती म्हणाली, "WOMB हे केवळ वेदना आणि दुःखाचे चित्रण नाही तर एकता आणि कृतीसाठी एक रॅली आहे. आम्हाला आशा आहे की, हा चित्रपट आम्हाला अशा जगाच्या एक पाऊल जवळ घेऊन जाईल, जिथे प्रत्येक स्त्रीचे कौतुक केले जाते. सन्मान केला आणि भरारी घेण्यासाठी सक्षम केले जाते,"

प्राईम व्हिडिओच्या मते, वुमेन ऑफ माय बिलियन भारतातील महिलांना सशक्त करण्यासाठी एक पाऊल उचलणार आहे. ही डॉक्युमेंटरी नक्कीच काहीतरी खास असणार यात शंका नाही!

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news