Prithvi Shaw Akriti Agarwal Separation: पृथ्वी शॉचा साखरपुडा मोडला; आकृती अग्रवालची भावुक पोस्ट, म्हणाली ‘प्रेम असलं तरी....’

Prithvi Shaw Akriti Agarwal Separation: पृथ्वी शॉ आणि आकृती अग्रवाल यांनी परस्पर संमतीने वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे.
Prithvi Shaw Akriti Agarwal Separation
Prithvi Shaw Akriti Agarwal SeparationPudhari
Published on
Updated on

Prithvi Shaw Akriti Agarwal Separation: भारतीय क्रिकेटपटू पृथ्वी शॉ आणि त्याची होणारी बायको आकृती अग्रवाल यांनी एकत्र न राहण्याचा निर्णय घेतला आहे. आकृतीने सोशल मीडियावर भावुक पोस्ट करत दोघांनीही परस्पर संमतीने वेगळे होण्याचा निर्णय घेतल्याची माहिती दिली. मार्च 2026 मध्ये दोघांनी साखरपुडा केल्यानंतर त्यांच्या नात्याची चर्चा झाली होती.

आकृतीने आपल्या पोस्टमध्ये म्हटले की, “जड अंतःकरणाने सांगावे लागत आहे की, मी आणि पृथ्वीने वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. आपल्या भविष्यासाठीची उद्दिष्टे आणि परिस्थिती वेगवेगळी असल्यामुळे आम्ही हा निर्णय घेतला.”

तिने पुढे स्पष्ट केले की, दोघांमध्ये प्रेम आणि एकमेकांविषयीची काळजी कायम असली तरी त्यांच्या जबाबदाऱ्या आणि सध्याच्या परिस्थितीमुळे वेगळे मार्ग निवडणे योग्य असल्याचे दोघांनाही जाणवले. त्यामुळे परस्पर समजुतीने त्यांनी हे नाते संपवण्याचा निर्णय घेतला.

आकृतीने आपल्या पोस्टमध्ये दोघांसाठीही “आनंद, शांतता आणि उत्तम भविष्यासाठी” शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच या कठीण काळात त्यांच्या खासगी आयुष्याचा आदर करण्याचे आवाहन तिने केले आहे.

विशेष म्हणजे, या निर्णयामागील कारणांबाबत कोणतेही अंदाज किंवा अफवा पसरवू नयेत, असेही आकृतीने स्पष्ट सांगितले. नातं का संपलं याबाबत तिने कोणतेही अतिरिक्त स्पष्टीकरण दिलेले नाही.

Prithvi Shaw Akriti Agarwal Separation
EPFO New Rule: आजपासून नवा नियम लागू; 25 हजार पगार असेल तर किती मिळणार पेन्शन? समजून घ्या गणित

मार्चमध्ये झाला होता साखरपुडा

पृथ्वी शॉ आणि आकृती अग्रवाल यांचा मार्च 202 मध्ये साखरपुडा झाला होता. साखरपुड्याचे फोटो पृथ्वी शॉने सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर त्यांच्या नात्याची चर्चा झाली होती.

यानंतर जुलै महिन्यात आकृतीच्या काही गूढ सोशल मीडिया पोस्टमुळे त्यांच्या नात्याबाबत चर्चांना उधाण आले होते. मात्र, त्या पोस्टचा पृथ्वी शॉशी थेट संबंध असल्याचे त्यावेळी अधिकृतपणे स्पष्ट झाले नव्हते.

Prithvi Shaw Akriti Agarwal Separation
EPFO New Rule: आजपासून नवा नियम लागू; 25 हजार पगार असेल तर किती मिळणार पेन्शन? समजून घ्या गणित

आता आकृतीच्या ताज्या पोस्टमुळे दोघांनीही परस्पर संमतीने वेगळे होण्याचा निर्णय घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र, या निर्णयामागील नेमकी कारणे काय आहेत, याबाबत आकृतीने कोणतीही माहिती दिलेली नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news