पुढारी वृत्तसेवा
एकीकडे संपूर्ण भारत देश आयसीसी टी-२० विश्वचषक २०२६ च्या विजयाचा जल्लोष साजरा करत असताना, दुसरीकडे भारतीय फलंदाज पृथ्वी शॉ याने आपल्या चाहत्यांना एक सुखद धक्का दिला आहे.
पृथ्वीने आपली गर्लफ्रेंड आकृती अग्रवाल हिच्यासोबत साखरपुडा उरकला असून सोशल मीडियावर या खास क्षणांचे फोटो शेअर केले आहेत.
पृथ्वी आणि आकृती गेल्या अनेक काळापासून एकमेकांना डेट करत होते. आपल्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवरून साखरपुड्याचे फोटो शेअर करताना पृथ्वीने अत्यंत रोमँटिक कॅप्शन दिले आहे.
त्याने लिहिले की, "मैदानावरच्या षटकारांपासून ते आयुष्यभराच्या एका शानदार इनिंगपर्यंत... ती माझी 'परफेक्ट इनिंग' आहे."
क्रिकेट विश्वातील दिग्गज आणि चाहत्यांनी त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला आहे.
कोण आहे आकृती अग्रवाल?
पृथ्वी शॉची होणारी पत्नी आकृती अग्रवाल ही एक प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएंसर आहे.
इंस्टाग्रामवर तिची मोठी लोकप्रियता असून तिचे ३२ लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. आकृती केवळ इन्फ्लुएंसरच नाही तर ती एक अभिनेत्री देखील आहे.
ती लवकरच 'त्रिमुखा' या तेलगू चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण करणार आहे.
आकृती सोशल मीडियावर फॅशन, लाइफस्टाइल आणि डान्सशी संबंधित आशय शेअर करत असते.
पृथ्वी शॉ गेल्या काही काळापासून भारतीय संघातून बाहेर आहे. त्याने आपला शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना २५ जुलै २०२१ रोजी श्रीलंकेविरुद्ध खेळला होता.