Prarthana Behere-Priya Marathe | 'कॅन्सरने तिचं शरीर झिजवलं पण..', प्रिया मराठेच्या आठवणीत प्रार्थनाची भावूक पोस्ट

Prarthana Behere-Priya Marathe | “कॅन्सरने शरीर झिजवलं पण आत्मा नाही” – प्रार्थनेची प्रियासाठी भावूक आठवण, प्रिया मराठेच्या आठवणीत प्रार्थनाची भावूक पोस्ट
Priya Marathe -Prarthana Behere
Prarthana Behere emotional post on Priya MaratheInstagram
Published on
Updated on

Prarthana Behere on Priya Marathe

मुंबई - मराठी अभिनेत्री प्रार्थना बेहरेने तिच्या जिवलग मैत्रीण प्रिया मराठेच्या आठवणींना उजाळा दिला आहे. तिने तिच्या आठवणी शब्दबद्ध करत भावनिक पोस्ट शेअर केली आहे. प्रार्थना म्हणाली, ''ती फक्त माझी सहकलाकार नव्हती, तर माझी खरी सख्खी मैत्रीण होती.” तिने आपल्या हळव्या शब्दांमध्ये प्रियाची मैत्री कशी होती, हेदेखील सांगितलं आहे. प्रिया एक मैत्रीण म्हणून कशी होती, तिच्यासोबत आपल्या मैत्रीचं महत्व देखील सांगितलं.

प्रार्थनाने इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक भावूक पोस्ट लिहिलीय. तिने प्रियाचे खूप सुंदर तीन चार फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. तिने एक मोठी पोस्ट देखील लिहिलीय.

Priya Marathe -Prarthana Behere
Param Sundari BO Collection | काय सांगताहेत विकेंडचे आकडे, परम सुंदरीला मिळाला संडेचा फायदा, कोटींचा वर्षाव

प्रार्थनाने काय म्हटलंय पोस्टमध्ये?

प्रार्थनाने म्हटलंय की, प्रिया तिच्या अलिबागच्या घरी आली होती. त्यावेळी तिच्या प्रकृतीत तोडी सुधारणा झाली होती. त्या वेळी तिने शांतपणे म्हटलं होतं, ''तुझं घर, वातावरण, हे कुत्रे... मला बरं करतायत. जणू काही हे ठिकाण मला heal करतंय.'' प्रार्थना आणि प्रिया यांनी एकत्र घर शेअर केलं होतं. त्या दिवसांच्या आठवणींना उजाळा देताना प्रार्थना म्हणते की, ''मॅगी, भुर्जी, कॉफी… हे आमचं छोटंसं जग होतं. तासन्‌तास गप्पा, वेडं हसणं आणि उशिरापर्यंत जागणं, या क्षणांना काही तोड नाही.'' अभिनयातील पहिला सीन, पहिल्यांदा कॅमेरा शेअर करणं, या सगळ्यात प्रिया तिच्यासोबत होती.

प्रार्थना लिहिते की, ''प्रिया हसमुख, प्रामाणिक, भावनाशील आणि जिव्हाळ्याने भरलेली होती. तिच्यासोबत घालवलेला प्रत्येक क्षण कायमचा मनात कोरला गेला आहे.'' कॅन्सरशी लढताना प्रिया खंबीर राहिली. एकदा तब्येत सुधारल्यावर ती प्रार्थनेच्या अलिबाग येथील घरी आली. त्या वेळी तिने शांतपणे म्हटलं होतं, ''तुझं घर, वातावरण, हे कुत्रे... मला बरं करतायत. जणू काही हे ठिकाण मला heal करतंय.'' हा क्षण प्रार्थनेच्या मनात कायमचा कोरला गेला आहे.

प्रार्थना शेवटी खूप भावनिक झाली. ती या पोस्टमध्ये म्हणते की, ''कॅन्सरने तिचं शरीर झिजवलं, पण तिचा आत्मा, तिचं खंबीरपणं हरवू शकला नाही. शेवटच्या क्षणापर्यंत तिने आम्हाला जगायला आणि हसवायला शिकवलं.'' प्रार्थनेच्या मते, प्रिया गेली असली तरी तिच्या आठवणी, तिचं हास्य आणि तिचा अभिनयातील तेज कायम तिच्यासोबत राहणार आहे.

Priya Marathe -Prarthana Behere
Tamil Actor Vishal-Sai Dhanshika Engagement | साऊथ स्टार विशालचा साखरपुडा; लॉन्गटाईम गर्लफ्रेंड साई धनशिका बनणार हमसफर

प्रार्थना आणि प्रियाने एकत्र केलं होतं काम

‘पवित्र रिश्ता’ मलिकेत अंकिता लोखंडेच्या बहिणीच्या भूमिकेत प्रिया मराठेने काम केलं होतं. तर प्रार्थनाने पवित्र रिश्तामध्ये वैशालीची भूमिका साकारली होती. प्रार्थना बेहेरेचे प्रियासोबत खूप चांगले संबंध होते.

प्रिया मराठेच्या निधनानंतर ती खूप रडताना दिसली. अंत्यदर्शन घेण्यासाठी प्रार्थना प्रियाच्या घरी पोहोचली होती. प्रिया ३८ वर्षांची होती. ती कॅन्सरशी झुंज देत होती. मागील १ वर्षांपासून ती सोशल मीडियापासून दूर होती. आणि कोणत्याही नव्या शोमध्ये दिसली नव्हती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news