

Vishal Engagement photo viral
मुंबई - तमिळ अभिनेता विशालने अभिनेत्री साई धनशिका सोबत साखरपुडा केला. त्याने खुद्द ही माहिती सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून दिली. त्याने काही फोटोदेखील पोस्टमध्ये शेअर केले आहेत.
विशालने आपल्या इन्स्टाग्रामवर साखरपुड्याचे फोटो शेअर करत लिहिले, 'या ब्रह्मांडच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या सर्व प्रियजनांना माझ्या खास वाढदिनी शुभेच्छा आणि आशीर्वाद देण्यासाठी धन्यवाद. आज साई धनशिका सोबत आपल्या साखरपुड्याची आनंदवार्ता शेअर करताना आनद होत आहे. मी खूप खुश आहे. नेहमीप्रमाणे तुमचा आशीर्वाद आणि शुभेच्छांची कामना करतो.'
विशाल आणि साई एकमेकांना १५ वर्षांपासून ओळखतात. साई धनशिकाने यावर्षी मे मध्ये एका कार्यक्रमात साखरपुड्याची घोषणा केली होती. साखरपुड्याचा दिवस देखील यासाठी कास आहे कारण याच दिवशी विशालचा वाढदिवस देखील आहे. ते चांगले मित्र देखील आहेत.
विशाल -साई धनशिका यांच्यातील वयाची देखील चर्चा होत आहे. तो ४८ वर्षांचा झाला आहे. तर धनशिका ३५ वर्षांची आहे. २० नोव्हेंबर, १९८९ रोजी जन्मलेली साई धनशिका नोव्हेंबरमध्ये ३६ वर्षांची होईल. दोघांमध्ये १२ वर्षांचे अंतर आहे.
विशाल प्रसिद्ध तमिळ अभिनेता आहे. त्याचे नाव विशाल कृष्ण रेड्डीआहे चित्रपट इंडस्ट्रीत त्याने आपल्या करिअरची सुरुवात १९८९ मध्ये बालकलाकार म्हणून केली होती. मुख्य अभिनेता म्हणून त्याला २००४ मध्ये तमिळ चित्रपट ‘चेलामई’ मधून ओखळ मिळाली.