Param Sundari BO Collection | काय सांगताहेत विकेंडचे आकडे, परम सुंदरीला मिळाला संडेचा फायदा, कोटींचा वर्षाव

Param Sundari Box Office Collection | काय सांगताहेत विकेंडचे आकडे, परम सुंदरीला मिळाला संडेचा फायदा, कोटींचा वर्षाव
image of janhvi kapoor - sidharth malhotra
Param Sundari BO Collection x account
Published on
Updated on

Param Sundari Box Office Collection Day 4

मुंबई - सिद्धार्थ मल्होत्रा - जान्हवी कपूरचा चित्रपट २९ ऑगस्टला रिलीज झाला. पहिल्या दिवसापासून चित्रपटाने कमाईच्या बाबतीत गती पकडली. पण फायदा मिळाला तो विकेंडचा. रविवारच्या सुट्टी दिवशी चित्रपटाने चांगले प्रदर्शन करत बॉक्स ऑफिसवर चांगला गल्ला जमवला. चौथ्या दिवशी चित्रपटाने किती कमाई केली?

रोमँटिक कॉमेडी चित्रपटात जान्हवी आणि सिद्धार्थच्या जोडीने कमालीची कमाई केली. प्रेक्षकांसोबतच चित्रपट समीक्षकांकडून चांगल्या प्रतिक्रिया मिळत आहेत. चित्रपटाने पहिल्या दिवशी चांगली कमाई केली. सिवाय वर्ल्डवाईड बॉक्स ऑफिस कलेक्शन देखील ठिकठाक राहिले.

परम सुंदरी चौथ्या दिवशीचे कलेक्शन

रिपोर्टनुसार, परम सुंदरीने बॉक्स ऑफिसवर चांगली सुरुवात केली होती. चौथ्या दिवशी चित्रपटाने १ कोटींचे कलेक्शन केले. बॉक्स ऑफिसवर एकूण कलेक्शन २६.९६ कोटी पोहोचले आहे.

चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी दिलेल्या माहितीनुसार, पहिला आठवड्यात शुक्रवारी ७.३७ कोटी, शनिवारी १०.७ कोटी रु. असे एकूण कलेक्शन १७.४४ कोटी रु. राहिले आहे.

परम सुंदरीचे नेट कलेक्शन

Param Sundari BO Collection Day १- ७.२५ कोटी रुपये

Param Sundari BO Day २- ९.२५ कोटी रुपये

Param Sundari BO Collection Day ३ - १०.४५ कोटी रुपये

Param Sundari BO Collection Day ४ - १ कोटी रुपये

परम सुंदरी वर्ल्डवाइड कलेक्शन

रिपोर्टनुसार, परम सुंदरीने जगभरात आतापर्यंत २६.८० कोटी रुपयांचे कमाई केली आहे.

जान्हवीचे नवे फोटो व्हायरल
जान्हवीने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर परम सुंदरी चित्रपटाशी संबंधित काही नवे फोटो शेअर केले आहेत. पहिल्या फोटोत हत्तीसोबत पोझ देताना दिसते. दुसऱ्या फोटो आणि व्हिडिओत ती शास्त्रीय नृत्याची झलक दाखवतेय. आणखी एका फोटोमध्ये ती अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा सोहत फोटो पोझ देतेय. या फोटोंवर फॅन्सकडून अनेक कॉमेंट्स येत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news