

Happy Birthday Jethalal actor Dilip Joshi
मुंबई - तारक मेहता का उल्टा चश्मा फेम जेठालाल अर्थातच अभिनेते दिलीप जोशी यांचा आज २६ मे रोजी ५७ वा वाढदिवस आहे. मालिकांसोबतच चित्रपटांमध्येही काम केलेल्या दिलीप जोशी यांच्याविषयी जाणून घेऊया. मालिका, चित्रपट करिअर आणि त्यांचे वैयक्तिक जीवन कसे आहे, याबद्दल जाणून घ्यायला तुम्हाला नक्कीच आवडेल.
दिलीप यांनी शाहरुख खान, सलमान खान यांच्यासोबत सहकलाकार म्हणून काम केलं आहे. पण ‘जेठालाल’च्या भूमिकेतून त्यांना प्रचंड लोकप्रियता मिळाली. दिलीप जोशी यांचा जन्म २६ मे, १९६८ ला गुजराती परिवारात झाला. पण एक अभिनेता म्हणून जेठालाल कसे आहेत, जाणून घेऊया. तारक मेहतामध्ये त्यांना बापूजी ही भूमिका ऑफर झाली होती.
करिअरमध्ये सुरुवातीला बराच काळ थिएटर केलं आणि नंतर ते अभिनय क्षेत्रात आले. दिलीप यांनी सलमान खान यांच्या ‘मैंने प्यार किया’ मध्ये काम केलं. त्यानंतर शाहरुख खानचा चित्रपट ‘वन २ का ४’ ऑफर झाला. त्यामध्ये त्याने चंपकची भूमिका साकारली होत. ‘फिर भी दिल है हिन्दुस्तानी’, ‘हम आपके हैं कौन’, ‘व्हॉट्स योर राशि’, ‘ढूंढते रह जाओगे’, ‘खिलाड़ी 420’, ‘हमराज’ और ‘दिल है तुम्हारा’ यासारख्या चित्रपटातही त्याने काम केलं आहे.
एका मुलाखतीत त्यांनी सांगितले होते की, करिअरमध्ये संघर्ष करत असताना जवळपास एक वर्षांपर्यंत त्यांच्याकडे कोणतेही काम नव्हते. एक ट्रॅव्हल एजन्सी होती, त्यामध्ये ५ वर्षे पार्टनर म्हणून काम केल्यानंतर त्यांनी ते काम सोडलं होतं.
दिलीप यांनी सांगितलं होतं की, त्यांना असित मोदी यांनी आधी चंपक लाल ही भूमिका ऑफर केली होती. ते म्हणाले होते की, “मी ऑडिशन दिलं नव्हतं, असित भाईंनी मला चॉईस दिलं होतं. कारण ते मला लहानपणापासून ओळखत होत. त्यांनी मला सांगितलं होतं की, तू जी भूमिका करशील ती चांगली करशील, तू निर्णय घे की तुला काय करायचं आहे. चंपक लाल की जेठालाल.
''आम्ही लहानपणापासून तारक भाईचे कॉलम, वाचत आलो होतो. त्यामुळे मला माहिती होतं की, हे काय आहे आणि काय नाही. मी म्हणालो की, चंपक लाल तर मी दिसणार नाही आणि जेठालाल देखील नाही होऊ शकत. कारण कॉलममध्ये जो जेठालाल होता तो फार सडपातळ होता. मग मी प्रयत्न केला आणि मला ही मालिका मिळाली'', असेही त्याने सांगितले होते.