पोस्ट ऑफीस उघडं आहे : प्रजासत्ताक दिनानिमित्त सैन्यदलासाठी विशेष शुभेच्छा पत्रे

post office ughad ahe
post office ughad ahe
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : 'पोस्ट ऑफीस उघडं आहे…' ही मालिका सोनी मराठी वाहिनीवर प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी दाखल झाली आहे. पारगावातल्या पोस्ट ऑफीसमधील ही गोष्ट आहे. या मालिकेतल्या कुलकर्णी, गुळस्कर, निरगुडकर अशा काही व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्या आहेत. पोस्ट मास्टर कुलकर्णी यांना प्रतीक्षा आहे, त्यांच्या बदलीची तसेच निरगुडकरांना चिंता आहे रंजना काय म्हणेल याची.

मालिकेत आता २६ जानेवारी रोजी, प्रजासत्ताक दिनानिमित्त शाळेतील मुलांनी भारतीय सैनिकांसाठी शुभेच्छा पत्रे तयार केली आहेत. ती शुभेच्छा पत्रे एवढी सुंदर हिली आहेत की, पोस्टातील कर्मचारी ती पत्रे सैन्यदलापर्यंत स्वखर्चानी पोहोचवणार आहेत. मुलांच्या भावना व देशावरचं प्रेम त्या पत्रांतून व्यक्त झालं आहे. पोस्ट अधिकाऱ्यांच्या मदतीने ती पत्रं सैन्यदलापर्यंत पोहोचवली आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news