BTS Perform in India | बीटीएस भारतात येणार? पॉप ग्रुप म्हणाला-''नमस्ते भारत, मिलते है अगले साल''

BTS Perform in India | प्रसिद्ध पॉप ग्रुप BTS २०२६ मध्ये भारतात परफॉर्म करणार, एका लाईव्ह व्हिडिओमध्ये ते म्हणाले की, ''नमस्ते भारत, मिलते है अगले साल''
image of k pop group
BTS Perform in India 2026?x account
Published on
Updated on
Summary

जगप्रसिद्ध K-pop ग्रुप BTS ने नुकत्याच एका लाईव्ह व्हिडिओद्वारे 2026 मध्ये भारतात परफॉर्म करण्याचे संकेत दिले असल्याचे वृत्त समोर आले आहे. “नमस्ते भारत, मिलते है अगले साल” या शब्दांनी त्यांनी एका लाईव्ह व्हिडिओमध्ये घोषणा केल्याचे म्हटले जात आहे. भारतातील असंख्य के पॉप चाहत्यांसाठी ही पर्वणीच असेलय सोशल मीडियावर या घोषणेची जोरदार चर्चा सुरू आहे. BTS चा भारत दौरा प्रत्यक्षात साकार झाला, तर तो भारतीय संगीतविश्वासाठी ऐतिहासिक ठरेल.

BTS India Concert 2026

जगभरात आपल्या संगीताने लाखो चाहत्यांची मने जिंकणारा कोरियन पॉप ग्रुप BTS पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. रिपोर्टनुसार, एका लाईव्ह व्हिडिओदरम्यान BTS च्या सदस्यांनी भारतातील चाहत्यांना खास शुभेच्छा दिल्या. 'नमस्ते भारत, मिलते है अगले साल' असे शब्द उच्चारत त्यांनी पुढील वर्षी २०२६ मध्ये भारतात परफॉर्म करण्याचे संकेत दिले आहेत.

image of k pop group
Battle of Galwan Teaser | सलमानकडून फॅन्ससाठी बर्थडेचं गिफ्ट, 'बॅटल ऑफ गलवान'चे भव्य टीझर प्रदर्शित

एका इंग्रजी वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, २७ डिसेंबर रोजी एका लाईव्ह बातचीत दरम्यान, बीटीएस सदस्य व्ही (V') ने संकेत दिले की, त्यांचा कॉन्सर्ट शो होणाऱ्या ठिकाणांपैकी भारत हे एक असू शकते. त्यातील एक खास संदेश होता, तो म्हणजे - 'नमस्ते, इंडियन आर्मीज. पुढच्या वर्षी भेटू.'

image of k pop group
Dnyanada Ramtirthkar च्या घरी वाजणार सनई-चौघडे, फ्लॉन्ट केले मोत्यांचे दागिने, व्हिडिओ व्हायरल

'व्ही'च्या या कॉमेंटमुळे चाहत्यांमध्ये जोरदार चर्चा सुरू झाली. या के पॉप ग्रुपचा दीर्घकाळापासून चर्चेत असलेला भारत दौरा पुढील वर्षी प्रत्यक्षात साकार होऊ शकतो. अनेक चाहत्यांना वाटत होते की, या ग्रुपने भारतात यावे. आता त्यांचे स्वप्न पूर्ण होऊ शकते. गायकांनी निश्चित ठिकाण आणि तारीख सांगितलेली नाही.

सूत्रांच्या माहितीनुसार, बीटीएसने भारतात आतापर्यंत कुठलेही लाईव्ह कॉन्सर्ट केलेलं नाही. पण, २०२६ मध्ये ते मुंबईमध्ये येऊ शकतात, Jungkook चे एक परफॉर्मन्स मुंबईत जानेवारी २०२६ मध्ये होण्याची शक्यता आहे. पण अद्याप कुठलीही अधिकृत पुष्टी झालेली नाही. मुंबई, दिल्ली किंवा बेंगळुरू यांसारखी शहरे संभाव्य ठिकाणे मानली जात आहेत.

परंतु कोल्डप्ले(Coldplay) सारख्या मोठ्या बँडसह यशस्वी कार्यक्रम आणि बीटीएसच्या गाण्यांशी ('My Universe') सारख्या त्यांच्या संबंधामुळे भारतीय चाहत्यांना त्यांची प्रतीक्षा आहे.

जर BTS खरोखरच भारतात लाईव्ह परफॉर्म करेल, तर तो केवळ संगीत कार्यक्रम न राहता सांस्कृतिक उत्सव ठरेल. भारतीय संगीतप्रेमींसाठी हा क्षण ऐतिहासिक ठरेल. K-pop ला भारतात आणखी मोठी ओळख मिळेल. आता चाहत्यांना फक्त अधिकृत घोषणेची प्रतीक्षा आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news