Battle of Galwan Teaser | सलमानकडून फॅन्ससाठी बर्थडेचं गिफ्ट, 'बॅटल ऑफ गलवान'चे भव्य टीझर प्रदर्शित

Battle of Galwan Teaser | सलमानकडून फॅन्ससाठी बर्थडेचं गिफ्ट, 'बॅटल ऑफ गलवान'चे भव्य टीझर प्रदर्शित
image of salman khan
Battle of Galwan Teaser out instagram
Published on
Updated on
Summary

सलमान खानने आपल्या वाढदिवसानिमित्त ‘बॅटल ऑफ गलवान’ चित्रपटाचा भव्य टीझर प्रदर्शित करून चाहत्यांना मोठं सरप्राईज दिलं आहे. भारतीय सैन्याच्या शौर्यावर आधारित या चित्रपटाचा टीझर सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून सलमानचा दमदार आणि गंभीर अवतार प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेत आहे.

Battle of Galwan Teaser out now

बॉलिवूडचा दबंग अभिनेता सलमान खान नेहमीच आपल्या चाहत्यांसाठी काही ना काही खास करत असतो. यंदा आपल्या वाढदिवसानिमित्त सलमानने फॅन्सना एक जबरदस्त गिफ्ट दिलं आहे. त्याच्या आगामी बहुप्रतीक्षित चित्रपट ‘बॅटल ऑफ गलवान’ चा भव्य टीझर अधिकृतरित्या प्रदर्शित करण्यात आला आहे.

image of salman khan
Akshaye Khanna | १ हजार कोटींच्या गल्ल्यानंतर अक्षयने फी वाढवत मागितले २१ कोटी? Drishyam-3चे निर्माते म्हणाले, 'त्याच्याकडे काम नव्हतं...'

सलमान खानच्या आज २७ डिसेंबर रोजी ६० व्या वाढदिवसाला फॅन्ससाठी मोठं सरप्राईज मिळालं आहे. आज बहुचर्चित चित्रपट बॅटल ऑफ गलवानचा टीझर प्रदर्शित झाला आहे. भव्य असा हा टीझर पाहून सोशल मीडियावर सलमानच्या फॅन्सकडून कॉमेंट्सचा पाऊस पडतोय.

हा चित्रपट भारत-चीन सीमेवर घडलेल्या गलवान खोऱ्यातील ऐतिहासिक संघर्षावर आधारित असल्याचं सांगितलं जात आहे. टीझरमध्ये भारतीय सैनिकांचं शौर्य, देशासाठी बलिदान आणि संघर्षाचं वास्तव प्रभावीपणे दाखवण्यात आलं आहे. अवघ्या काही सेकंदांच्या टीझरमध्येच देशभक्तीची तीव्र भावना निर्माण होते.

image of salman khan
Salman Khan च्या B'day साठी पनवेल फार्महाऊसवर सेलेब्सची गर्दी, MS Dhoni ने साक्षीसह लावली हजेरी, व्हिडिओ व्हायरल

सलमान खान स्टारर 'बॅटल ऑफ गलवान'चे टीजर रिलीज झाले आहे. टीजरमध्ये जे डायलॉग आणि सलमानचा सीन आहे, ते पाहून अंगावर शहारे येतील. चित्रपटात सलमानने कर्नल बी. संतोष बाबूची भूमिका साकारली होती. २०२० मध्ये भारत-चीन दरम्यान झालेल्या गलवान घाटीतील झडपमध्ये शहीद झाले होते. १६ बिहार रेजिमेंट कमांडिंग ऑफिसर होते. त्यांना मरणोपरांत देशाचे दुसरे सर्वोच्च वीरता पुरस्कार महावीर चक्रने सन्मानित करण्यात आले होते.

'बॅटल ऑफ गलवान' बी. संतोष बाबू आणि त्या लढाईतील शहीदांना श्रद्धांजली आहे. टीझरमध्ये गाण्याची झलक देखील आहे. 'मेरा देश मेरी जान है' असे गाण्याचे बोल आहेत. दिग्दर्शन अपूर्व लाखियाने केले आहे. यामध्ये चित्रांगदा सिंह देखील आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news