

मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकर सध्या एका खास कारणामुळे चर्चेत आली आहे. नुकताच तिचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, या व्हिडिओमुळे तिच्या वैयक्तिक आयुष्याबाबत उत्सुकता वाढली आहे. व्हिडिओमध्ये ज्ञानदा अत्यंत सुंदर अशा मोत्यांच्या दागिन्यांमध्ये दिसत असून, तिचा लूक पाहून चाहत्यांच्या नजरा थक्क झाल्या आहेत.
मराठी अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकर हिचा मोत्यांचे दागिने परिधान केलेला व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर तिच्या लग्नाच्या चर्चांना उधाण आलं आहे. साधा पण एलिगंट लूक आणि आनंदी भावमुद्रा पाहून चाहत्यांमध्ये सनई-चौघडे वाजणार असल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत.
या व्हिडिओत ज्ञानदा पारंपरिक अंदाजात दिसत आहे. साधी पण उठावदार साडी, त्यावर मोत्यांचे नेकलेस, कानातले आणि मंगळसूत्रसदृश दागिने तिने फ्लॉन्ट केले आहेत.
तिच्या चेहऱ्यावरचं हास्य आणि आत्मविश्वास पाहता अनेकांनी थेट अंदाज बांधायला सुरुवात केली आहे की, ज्ञानदाच्या घरी लवकरच सनई-चौघडे वाजणार का?
हर्षद आत्माराम आणि ज्ञानदा रामतीर्थकर या जोडीचा साखरपुडा नुकताच पार पडला. लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेत मुख्य अभिनेत्री म्हणून ज्ञानदाने काम केले होते. आता ती लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे
हर्षद सोबतचे तिचे नवे साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या फोटोंच्या कॅप्शनमध्ये तिने दागिन्यांबद्दल माहिती लिहिलीय. शिवाय साखरपुड्याची तिची गोल्डन कलर पारंपरिक साडी खास ठरली.
तिने कॅप्शनमध्ये लिहिलं- Flaunting the ring is my favourite thing these days! साखरपुड्यासाठी अस्सल मोतीचे खास दागिने तिने घातले होते. साखरपुड्याची अंगठी, बांगड्या, नेकलेस, कानसाखळ्या आदीच खास होत्या. ज्ञानदाच्या हातावरील मेहंदी देखील तितकीच खास होती