

अभिनेता आणि सध्याचे आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री पवन कल्याण सध्या चर्चेत आहेत. एका इव्हेंट दरम्यान पवन कल्याण यांनी तलवारबाजी केली पण ही तलवार त्यांच्याच बॉडीगार्डला लागता लागता राहिली. (Latest Entertainment News)
पवन यांनी हैदराबादमध्ये त्यांचा आगामी सिनेमा ' दे कॉल हिम ओजी' च्या प्री रिलीज इवेंटमध्ये धमाकेदार एंट्री केली. हातात तलवार घेऊन आलेल्या पवन यांनी ती परजली. त्यावेळी त्यांच्या आसपास असलेल्या बॉडीगार्डसना त्यापासून वाचण्यासाठी चांगलीच धावपळ करावी लागली. आता हा विडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाल्यावर नेटीझन्सनी पवन यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे.
या कार्यक्रमात पवन त्याच्या व्यक्तिरेखेच्या म्हणजेच ओजस गंभीरा अर्थात ओजीच्या अवतारात आला होता. प्रचंड मोठ्या प्रमाणावर पाऊस असूनही गर्दी पवनला पाहण्यासाठी थांबली होती. पण पवन तलवार परजताना आसपास लोक आहेत हे मात्र पूर्णपणे विसरुन गेल्याचे या व्हीडियोमध्ये दिसत आहे. अर्थात अनेकांना हे आवडलेले दिसत नाही.
संपूर्णपणे काळे कपडे घातलेल्या पवन कल्याण यांनी ओजीच्या कलाकारांसहित क्रू मेंबरचेही जबरदस्त कौतुक केले. या इव्हेंटमध्ये ते बोलता बोलून गेले की 'एक दिवसासाठी मी विसरून गेलो होतो की तो आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री आहेत. तुम्ही कोणत्या मुख्यमंत्र्याला तलवार घेऊन फिरताना पाहिले आहे का? पण हा सिनेमा आहे त्यामुळे हे चालू शकते.
'ओजी' चे दिग्दर्शक आणि हीरो सुजीत यांचेही पवन कल्याण यांनी कौतुक केले. तसेच त्यांनीच या सिनेमाचे लेखनही केले आहे.
या सिनेमात पवन कल्याण, इम्रान हाशमी, प्रियंका मोहन, अर्जुन दास, श्रीया रेड्डी, प्रकाश राज
यांच्या मुख्य भूमिका आहेत.
सुजीत यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेला हा सिनेमा 25 सप्टेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे.