

मराठी मालिकांच्या वेळेत आणि कथानकात बदल होणे ही काय नवीन गोष्ट राहिली नाही. आताही लाखात एक आमचा दादा या मालिकेच्या संदर्भात एक महत्त्वाची बातमी समोर येते आहे. बहीण भावाच्या प्रेमावर आधारीत ही मालिका आता निरोप घेण्यासाठी सज्ज झाली आहे. (Latest Entertainment News)
नितीश चव्हाण आणि मृण्मयी गोंधळेकर हे या मालिकेत मुख्य भूमिकेत आहेत. सूर्या आणि तुळजाची ही जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरते आहे. या मालिकेत राजश्रीने मालिकेसंदर्भात कृतज्ञता व्यक्त करणारी पोस्ट शेयर केली आहे.
आपल्या पोस्टमध्ये इषा म्हणते 'राजश्री म्हणून शेवटचं एकदा तयार होताना...' ईशाने कॅप्शनमध्ये असे लिहिले की, 'मन खूप भरुन आलंय, फक्त खूप साऱ्या आठवणी मनात घोंगावत आहेत, डोळ्यात पाणी अन् हात थंड पडलेत... 1 वर्ष आणि 5 महिने... राजू या भूमिकेतून निरोप घेते.'
इशाच्या पोस्टवर अनेकांच्या कमेंट आल्या आहेत. तिला सगळ्यांनी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. याशिवाय आणखी एक मालिका दुसऱ्या चॅनेलवर प्रसारित होण्यासाठी सज्ज झाली आहे. तुला शिकवीन चांगलाच धडा ही मालिका 25 मे रोजी संपली होती.
लाखात एक आमचा दादा ही मालिका झी मराठीवरुन निरोप घेत असली तरी झी चित्रमंदिर या वाहिनीवर या मालिका पुन्हा पाहता येणार आहेत. 6 ऑक्टोबरपासून लाखात एक आमचा दादा ही मालिका झी चित्रमंदिरवर संध्याकाळी 7 वाजता दिसणार आहे. तर तुला शिकवीन चांगलाच धडा ही मालिका 7.30 वाजता पाहता येईल.