

अविका गौर आणि मिलिंद चंदवानीने नॅशनल टेलिव्हिजनवर आपल्या लग्नाबाबत शेयर करून सगळ्यांना आश्चर्यचकित केले आहे. ही जोडी येत्या 30 सप्टेंबरला लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. विशेष म्हणजे राधे मा आणि नेहा कक्कर हे देखील या लग्नाला उपस्थिती लावणार आहेत. (Latest Entertainment News)
अविका ने अलीकडेच दिलेल्या एका मुलाखतीदरम्यान हा खुलासा केला आहे. यावेळी लग्नाबाबतचे प्लान तिने उत्सुकतेने शेयर केले आहेत. ती म्हणते, ‘ हे खरे आहे की मी आता रोज स्वत:ला सांगते आहे की हो हे खरे आहे. मी पाहिलेले स्वप्न आता सत्य होत आहे. मला असा जीवनसाथी मिळाला आहे की जो मला समजून घेतो आहे.
अविका सांगते की तिच्या कुटुंबाने तिच्या या निर्णयाने स्वागत केले आहे. जेव्हा सेटवर लग्नाचे निमंत्रण दिले गेले माझी आई प्रचंड भावुक झाली. आमचे लग्न एका टिपिकल भारतीय भल्यामोठ्या लग्नासारखे वाटत आहे. आज रात्री सिद्धिविनायक मंदिरात जाऊन मी निमंत्रण देईन त्यानंतर खरी सुरुवात झाल्यासारखी वाटेल.
अविका प्रकाशझोतात आली ती बालिकावधू मालिकेतील आनंदी या व्यक्तिरेखेमुळे. या मालिकेने तिला घराघरात स्थान मिळाले. तिची दुसरी व्यक्तिरेखा होती ती 'ससुराल सिमर का' मालिकेत यात ती दीपिका कक्करच्या धाकट्या बहिणीच्या भूमिकेत दिसली होती. याशिवाय अविकाने तेलुगू सिनेमात काम केले आहे. तसेच कन्नड आणि तुर्की सिनेमातही तिच्या अभिनयाची झलक दिसली आहे.
मिलिंद चंदवानी हा सामाजिक कार्यकर्ता असून तो आणि अविका बराच काळ नात्यात आहेत. अलीकडेच या दोघांनी साखरपुड्याची घोषणा केली होती.