Paresh Rawal: परेश रावल यांच्या 'द ताज स्टोरी' विरुद्ध भाजपा नेत्याने केली तक्रार दाखल

परेश रावल अभिनीत सिनेमा द ताज स्टोरीवर बंदी आणण्याची मागणी केली आहे
Entertainment
'द ताज स्टोरी' विरुद्ध भाजपा नेत्याने केली तक्रार दाखलPudhari
Published on
Updated on

अयोध्यातील भारतीय जनता पार्टीच्या एका नेत्याने सूचना आणि प्रसारण मंत्रालय आणि सेन्सॉर बोर्डमध्ये तक्रार दाखल परेश रावल अभिनीत सिनेमा द ताज स्टोरीवर बंदी आणण्याची मागणी केली आहे. त्यांनी दावा केला आहे की हा सिनेमा त्यांनी दाखल केलेल्या याचिकेवर आधारित आहे. (Latest Entertainment News)

अयोध्येतील भाजप प्रवक्ता रजनिश सिंह यांनी मे 2022 अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनऊ खंडपीठात एक याचिका दाखल केली आहे. ज्यामध्ये ताज महलच्या आतील 22 बंद खोल्या उघडण्याची मागणी केली गेली. ज्यामध्ये दावा केला गेला की हे स्मारक मूळ एक मंदिर आहे.

Entertainment
Actress 100-year-old House: पूर्वजांच्या 100 वर्षे जुन्या घरात राहते आहे ही अभिनेत्री; फोटो पाहून तुम्हीही व्हाल अवाक

या याचिकेत त्यांनी 17 व्या शतकातील स्मारकाबाबत अधिक खुलासा होण्यासाठी भारतीय पुरातत्व खात्याचा समावेश करत एक समिति स्थापन करण्याची मागणी केली होती. ही याचिका त्यावेळीच रद्द केली होती.

सूचना आणि प्रसारण मंत्रालय आणि केंद्रीय फिल्म प्रमाणपत्र बोर्डाकडे सोमवारी केलेल्या आपल्या तक्रारीत म्हणाले आहेत की, ‘मी ताजमहालच्या 22 बंद खोल्या उघडण्यासाठी एक जनहित याचिका दाखल केली होती. माझा उद्देश केवळ हा पारदर्शकपणा सुनिश्चित करणे आणि ऐतिहासिक तथ्य समोर आणणे महत्त्वाचे होते. मला समजले की ताज स्टोरी हा सिनेमा माझ्या याचिकेवर बेतला आहे. त्यांनी असा दावा केला की सिनेमाचे पोस्टर, प्रचार सामग्री आणि याचिकेचा विषय हा त्यांच्या परवानगी शिवाय घेतला आहे.’

Entertainment
तू आपल्या कुटुंबाशी.....! सासूबाई मृणाल कुलकर्णी यांनी सूनबाई शिवानी रांगोळेसाठी लिहिली हृदयस्पर्शी पोस्ट

पुढे ते म्हणतात, ‘ हे माझ्या बौद्धिक आणि कायदेशीर हक्कांचे उल्लंघन आहे.’ जोपर्यंत या प्रकरणाची चौकशी होत नाही तोपर्यंत सिनेमाच्या प्रमोशन आणि प्रदर्शनावर बंदी घालण्याची मागणी केली.

तुषार अमरीष गोयल यांनी हा सिनेमा लिहला आणि दिग्दर्शित केला आहे. या सिनेमात परेश रावल, जाकिर हुसैन, अमृता खानविलकर नमित दास आणि स्नेहा वाघ मुख्य भूमिकेत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news