
फराह खान आणि तिचा कुक दिलीपने आपल्या व्लॉग साठी वेगवेगळ्या सेलिब्रिटींच्या घरी हजेरी लावतात. यावेळी ते डायना पेंटीच्या घरी गेले होते. डायनाच्या पणजोबांचे असलेले हे घर जवळपास 100 वर्षे जुने आहे. जसे काही तिच्या घरात आल्यावर राजवाड्यात आल्यासारखाच फील येत होता. फराहच्या कुकनेही हे घर पाहून आश्चर्य व्यक्त केले.
डायनाच्या घरी प्रवेश करताच फराह आणि दिलीपने आश्चर्याने आ वासला. यानंतर घरात डायनाने या दोघांचे स्वागत केले.
डायनाच्या घरातील भव्य एंट्रेन्स पाहून दोघांनीही आश्चर्य व्यक्त केले.
घरच्या दिवाणखान्यात प्रवेश केल्यानंतर फराह म्हणते, मला असे वाटत आहे की मी वेळेत मागे गेले आहे. त्यावेळी डायनाच्या आईने सांगितले की हे फर्निचर 100 वर्षे जुने आहे.
अर्थात या जुन्या घरात किचन मात्र बऱ्यापैकी अपडेट आहे. डायनाने सांगितले की ती या घरात राहणारी चौथी पिढी आहे
या घराची भव्यता पाहून फराह म्हणते, 'लोखंडवालाचा डान्स स्टुडियोही या घरासमोर लहान आहे. सगळे किती सुंदर आहे.